Nana Patole : 'तांबेंचा हायव्होल्टेज ड्रामा, माझ्याकडे ही खूप 'मसाला' : पटोलेंचा सूचक इशारा!

Nana Patole : विखे पाटील यांच्या बद्दल मी पद्धतशीरपणे बोलणार आहे.
Satyajeet Tambe : Nana patole
Satyajeet Tambe : Nana patoleSarkarnama

Nana Patole : काँग्रेसचे माजी नेते व अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. मला आणि माझे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नते बाळासाहेब थोरात यांना पक्षातून बाहेर ढकलण्याचा त्यांचा डाव होता, असे तांबे म्हणाले होते. तांबेच्या या आरोपावर आता पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, आमचे प्रवक्ते सत्यजित तांबे यांना उत्तर देतील. तांबेबद्दल हाय कमांड यावर निर्णय घेतील. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बद्दल मी पद्धतशीरपणे बोलणार आहे. आमच्यात महाविकास आघाडीत काहीच वाद नाहीत, माझ्याकडे खूप मसाला आहे, पण मला तेवढं सांगायचे नाही. इकडे तिकडे जे दोन्ही बाजूने चालतात, त्यांना मला उत्तर द्यायचे नाही, असे पटोले म्हणाले.

Satyajeet Tambe : Nana patole
Harshvardhan Jadhav News : राजकारणात काही नको म्हणणारे जाधव अचानक विधानसभेच्या तयारीला ? हे आहे कारण..

"कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या बाबतीत पटोले म्हणाले, पुण्यातील ७ उमेदवाराची नाव हाय कमांडकडे पाठवले आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक साठी उद्या नाव जाहीर होईल. कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे," असे पटोले म्हणाले.

Satyajeet Tambe : Nana patole
MNS Warn News : आधी बाभळीचा पाणीप्रश्न सोडवा, मगच पाय ठेवा ; केसीआरांची सभा उधळणार

भाजपची नियत एक शुद्र पध्द्तीने वागणे, एखद्याला वापरून फेकून देणे आहे. मुक्ताताई (मुक्ता टिळक) आजारी असतानाच भाजपने त्यांना निवडणुकीसाठी बोलावलं. निष्ठावंतांना डावलेले गेले, हे बरोबर नाही गरज संपली की फेकून देणे हे भाजपचे वागणे आहे.असेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com