निवडणुकीच्या मुहूर्तावर तुरुंगातून बाहेर आलेल्या बाबा राम रहीमने 24 तास आधी खोलले पत्ते

पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला आहे.
Gurmeet Ram Rahim
Gurmeet Ram Rahim Sarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे. पंजाबमध्ये उद्या (ता.20) मतदान होत असून, त्याआधी 24 तास राम रहीने पत्ते खोलले आहेत. डेऱ्यातून अनुयायांना संदेश पोचवण्यास सुरवात झाली आहे.

पंजाबमध्ये उद्या विधानसभेसाठी मतदान (Assembly Election) होत असून, त्याआधी डेऱ्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राम रहीमच्या निर्णयाकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष होते. डेऱ्यातून अनुयायांना तोंडी संदेश पाठवले जात आहेत. राम रहीमने कोणत्याही एका पक्षाला मतदानाचा आदेश दिलेला नाही. याऐवजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार निवडून त्याला मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात भाजप, अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाऐवजी कोणत्या उमेदवाराने डेऱ्याला मदत केली, हा निकष लावण्यात आला आहे.

पंजाबमध्ये अनुसूचित जातींना समोर ठेवून मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना काँग्रेसने चेहरा बनवले आहे. याचवेळी राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी हे अनुसूचित जातींमधील आहेत. काँग्रेसची व्होटबँक असलेल्या हा मतदार राम रहीममुळे पक्षापासून दुरावला जाऊ शकतो. राम रहीमचे पंजाबमध्ये माझा, माळवा आणि दोआबा या विभागात डेरे आहेत. तेथे त्याला मानणारा वर्ग अधिक आहे. याचबरोबर हरियानातील सिरसा जिल्ह्यात त्याचा प्रमुख डेरा आहे. माळवा विभागात राम रहीमची ताकद अधिक असून, तेथील तब्बल 69 जागांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. पंजाबमधील 2007, 2012, 2017 मधील विधानसभा निवडणुकीत डेराने महत्वाची भूमिका बजावली होती. याचसोबत डेराने 2014 ची लोकसभा आणि हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा दिला होता.

Gurmeet Ram Rahim
दरेकरांच्या गाडीला महिन्यात तिसऱ्यांदा अपघात अन् पडळकर म्हणाले...

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरुंगात आहे.

Gurmeet Ram Rahim
दरेकरांना घातपात? एकाच महिन्यात तिसऱ्यांदा गाडीला अपघात

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com