Narendra Dabholkar Case : तब्बल 10 वर्षांनंतर नरेंद्र दाभोलकरांना न्याय मिळणार? उद्या निकाल

Pune Dabholkar News : विवेकवादी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दाभोळकरांनी आपले जीवन सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांचे निर्मूलनासाठी समर्पित केले होते. त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना शनिवार पेठेतील ओंकारेश्वर पुलाजवळ दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
Narendra Dabholkar
Narendra DabholkarSarkarnama

Pune Crime News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल तब्बल दहा वर्षानंतर शुक्रवारी (ता. 10) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आला आहे. या प्रकरणाचा विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव हे निकाल देण्याची शक्यता आहे. हत्येनंतर दहा वर्षांनी हे प्रकरणाचा निकाल लागत असल्याने याकडे राज्यासह देशाचे लक्ष आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर 15 सप्टेंबर 2021 ला आरोप निश्चित करण्यात आले आहेत. प्रथम या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणावर नरेंद्र दाभोळकरांचे पुत्र हमिद दाभोळकरांनी Hameed Dabholkar कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

विवेकवादी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दाभोळकरांनी Narendra Dabholkar आपले जीवन सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांचे निर्मूलनासाठी समर्पित केले होते. त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना शनिवार पेठेतील ओंकारेश्वर पुलाजवळ दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा सुरुवातीला तपास पुणे पोलीस करत होते, नंतर मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण जून 2014 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले.

नवी मुंबईतील Mumbai डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर शहरातील विशेष न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यानुसार तावडे, सचिन अंदुरे, शरद काळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यासह सनातन संस्थेशी संबंधित पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे आणि काळसकर तुरुंगात तर पुनाळेकर आणि भावे जामिनावर बाहेर आहेत.

Narendra Dabholkar
Ajitdada On Sharad Pawar : बारामतीचे मतदान संपताच 40 तासांतच अजित पवार म्हणाले, ‘पवारसाहेब आमचे दैवत....’

खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने 20 साक्षीदार तपासले तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणाले, 'आम्ही 20 साक्षीदार तपासले आहेत आणि खटला पूर्ण झाला. खटला आता अंतिम आदेशाच्या टप्प्यावर आहे. बचाव पक्षाचे वकील प्रकाश सिलसिंगीकर म्हणाले, 'आमच्या दोन साक्षीदारांची बचाव पक्षाकडून तपासणी करण्यात आली आहे. आम्ही नेहमीच त्यांची हत्येतील भूमिका नाकारली आहे.'

दाभोलकर यांच्या हत्येनंतर फेब्रुवारी 2015 मध्ये ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे Govind Pansare, ऑगस्ट 2015 मध्ये कन्नड अभ्यासक एमएम कलबुर्गी आणि सप्टेंबर 2017 मध्ये स्पष्टवक्ते पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. विवेकवाद्यांच्या या सलग झालेल्या हत्यांसाठी एक समान दुवा आणि त्याच शस्त्राचा वापर केला जाऊ शकतो, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. मात्र या सर्वांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार अद्यापही तपास यंत्रणा जप्त करू शकलेले नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Dabholkar
Sharad Pawar News : तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर; शरद पवारांचा घणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com