Narendra Dabholkar Case : मोठी बातमी! दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

Narendra Dabholkar Case Verdict : पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणी अडीच वर्षे सुनावणी चालली. त्यानंतर अखेर न्यायालयानं निकाल दिला आहे.
Narendra Dabholkar
Narendra Dabholkarsarkarnama

Pune News, 10 May : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणाचा निकाल अखेर 11 वर्षांनी निकाल लागला आहे. यावर पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती.

याप्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाखांचा दंड, अशी शिक्षा 'सीबाआय'च्या विशेष न्यायालयानं सुनावली आहे.

सचिन अंदुरे ( Sachin Andure ) आणि शरद कळसकरने ( Sharad Kalaskar ) गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्याआधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

डॉ. दाभोलकर यांची शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला.

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जून 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला होता.

15 सप्टेंबर 2021 रोजी विशेष न्यायालयाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते. आरोपींविरुद्ध भादंवि 302 (खून), 120 ब (कट रचणे), बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरुवातीला या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झाली. नावंदर यांची बदली झाल्यानंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी या खटल्यात 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

  • 20 ऑगस्ट 2013 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून

  • पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

  • मे 2014 : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे

  • जून 2016 : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक केली.

  • सप्टेंबर 2016 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल.

  • ऑगस्ट 2018 : महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.

  • मे 2019 : व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक, पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामिनावर सुटका.

  • सप्टेंबर 2019 : दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली.

  • सप्टेंबर 2021 : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.

  • आठ वर्षांनी 2021 मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपीविरोधात खटला सुरू

  • 10 मे 2024 सुमारे 11 वर्षांनी डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com