Narendra Modi News : पंतप्रधान मोदींचे 'एसपीजी' पुण्यात दाखल; पुण्यात असणार मोदींचा मुक्काम !

Pune Lok Sabha Constituency : पंतप्रधान मोदी यांची सोमवारी जाहीर सभा होणार तसेच पुणे शहरात रोड शो होणार आहे. मात्र, रोड शो चा मार्ग अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही..
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. मोदी 29 एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार असून ते पुण्यात सोमवारी मुक्कामी राहणार आहेत. मोदी येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा पथक (एसपीजी) शहरात दाखल झाले आहे. या पथकाकडून सभेच्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. तसेच ज्या भागातून मोदी जाणार आहेत. त्या मार्गाची पाहणी देखील करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये पुणे शहर, मावळ, शिरूर तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले आहे. हे दोन्ही मतदारसंघ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या तर त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार असून शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार ताकद लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Amol Kolhe criticism of Narendra Modi : मग मतं मागायला महाराष्ट्रात..., कोल्हेंनी मोदींना सुनावले !

या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा विजय व्हावा, यासाठी भाजपचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील आहेत. यासाठी मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पाच वर्षापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी पुण्यात प्रचारसभा घेतली होती. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा झाली होती. या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी सभा घ्यावी, अशी विनंती भाजपसह महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आता मोदी यांच्याकडून संमती देण्यात आली आहे.

सोमवारी नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. मात्र त्यांचा अधिकृत दौरा अद्यापही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडे आलेला नव्हता. मात्र भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांनी मोदी सोमवारी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे विशेष सुरक्षा पथक पुण्यात आले आहे. मोदी सोमवारी सकाळी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची सभा कराड येथे घेणार आहेत.

त्यानंतर ते हेलिकॉप्टरने ते पुण्यात दाखल होणार आहेत. संध्याकाळी रेसकोर्स येथील मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची शहरात वाहनातून रोड शो होणार आहे. मात्र, याचा मार्ग अद्याप राजशिष्टाचार विभागाला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत कळविण्यात आलेला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे राजभवन येथे मुक्कामासाठी जातील. मंगळवारी 30 एप्रिलला माढा होणाऱ्या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी जाणार आहेत.

Narendra Modi
Ramdas Athawale : '...हे ध्यानात असू द्या' म्हणत रामदास आठवलेंनी महायुतीलाच काढला चिमटा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com