Gram Panchayat Politics : नाटंबी गावात पाच सदस्यांचे थेट राजीनामास्त्र; निवडणुकीनंतर नेमकं काय घडलं ?

Bhor Political News : ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा विजय
Natambi Grampanchayat
Natambi GrampanchayatSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : ग्रामपंचायत निवडणुकीत पुण्यातील भोर तालुक्यामधील नाटंबी गावात सरपंचासह सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आले आहेत. एकाच पक्षाचे सदस्य असूनही उपसरपंच निवडीवरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडलेल्या उपसरपंचास विरोध करत सातपैकी पाच सदस्यांनी थेट राजीनामास्त्रच उपसले. परिणामी भोरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

भोरमधील नाटंबी ग्रामपंचायतीची सहा नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनेलचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल खोपडे थेट मतदारांतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सात सदस्य राष्ट्रवादीचेच विजयी झाले. एकाच पक्षाचे सदस्य असूनही उपसरपंच निवडीवरून गावात वादाची ठिणगी पडली आहे.

Natambi Grampanchayat
Maratha Vs OBC : पुण्यातील मागासवर्गीय आयोगाची बैठक ठरणार वादग्रस्त ! काय आहेत कारणं ?

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच खोपडेंच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात संगीता हनुमंत खोपडे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीवर नाराज पाच सदस्यांनी थेट राजीनामाच दिला. यात संदीप खोपडे, अर्चना खोपडे, स्वप्नील खोपडे, रूपाली खोपडे, अक्षदा खोपडेंचा समावेश आहे. सरपंच गैरहजर असल्याने त्यांनी ग्रामसेवक महेश लोहार यांच्याकडे सदस्यपदाचा राजीनामा दिला. आता ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच संगीता खोपडे व ग्रामपंचायत सदस्य सूरज जेधे हे दोन सदस्य उरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीनामे मंजूर होणार का ?

निवडणुकीनंतर नाटंबी गावाची मासिक सभा डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्या सभेत पाचही सदस्यांचे राजीनामे ठेवले जाणार आहेत. सदस्यांच्या नाराजीचे कारण आणि राजीनाम्याबाबत सभेत चर्चा होईल. त्यानंतरच सरपंच खोपडे संबंधित राजीनामे मंजूर करतील, असे ग्रामसेवक लोहार यांनी माहिती दिली. हे राजीनामे मंजूर झाले तर पुढील सहा महिन्यांत गावात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच हे राजीनामे मंजूर होणार की नाही, याबाबत गावासह तालुक्यात चर्चा सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Natambi Grampanchayat
Congress Politics : बाळासाहेब थोरातांना सरकारविरोधात मोठा मुद्दा मिळाला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com