Deputy Sarpanch Election उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचाने ‘गेम’ केला; पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सामूहीक राजीनामे

Bhor Taluka News : नाटंबी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी उपसरपंचपदासाठी एक नाव निश्चित केले होते.
Five Gram Members
Five Gram MembersSarkarnama
Published on
Updated on

Bhor News : उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचाने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर दुसऱ्याच उमेदवाराची बिनविरोध निवड जाहीर केली, त्यामुळे संतप्त झालेल्या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे सामूहीक राजीनामे दिले. या घटनेमुळे भोरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Resignation of five members of Natambi Gram Panchayat)

भोर तालुक्यातील नाटंबी ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सात सदस्य आणि विशाल प्रकाश खोपडे सरपंच म्हणून निवडून आले होते. उपसरपंचाची निवडणूक ता. २४ नोव्हेंबर रोजी झाली. निवडणुकीत सरपंच खोपडे यांनी इतर सदस्यांना बेसावध ठेवत सूरज प्रभाकर जेधे यांच्या मदतीने उपसरपंचपदासाठी संगीता हनुमंत खोपडे यांचा अर्ज भरून घेतला आणि त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Five Gram Members
No-Confidence Motion News : अविश्वास ठरावापूर्वी भाजपच्या सरपंचांचा राजीनामा; शेणोलीत नाट्यमय घडामोडी

दरम्यान संदीप धर्म खोपडे, अर्चना दत्तात्रय खोपडे, स्वप्निल आनंदा खोपडे, रूपाली राहुल खोपडे व अक्षदा विठ्ठल खोपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बैठकीला सरपंच न आल्याने ग्रामसेवक महेश लोहार यांच्याकडे या सदस्यांनी राजीनामे दिले.

वास्तविक इतर ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचपदासाठी नाव निश्चित केले होते. मात्र, ते नाव डावलून सरपंच विशाल खोपडे यांनी संगीता खोपडे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली. त्यासाठी त्यांनी इतर सदस्यांना गाफील ठेवले. संगीता खोपडे यांचे नाव जाहीर होताच आपली फसवणूक झाल्याचे सदस्यांच्या लक्षात आले.

Five Gram Members
Mohite Patil Sugar Factory : मोहिते पाटील कारखान्याची बारामतीच्या कंपनीने केली फसवणूक

राजीनामा दिलेल्या पाच सदस्यांनी याबाबतचा जाब विचारण्यासाठी सरपंच विशाल खोपडे यांना मंगळवारी (ता. २८ नोव्हेंबर) ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आले होते. पण सरपंच खोपडे हे त्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या पाच सदस्यांनी ग्रामसेवक महेश लोहार यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले.

भोरचे पोलिस हवालदार दत्तात्रेय खेंगरे हे याबाबतची माहिती मिळताच ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. गावात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामपंचायतीच्या पुढील मासिक बैठकीत पाच सदस्यांनी दिलेले राजानीमे ठेवण्यात येणार आहेत. सविस्तर चर्चा करून ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल, असे ग्राममसेवक महेश लोहार यांनी सांगितले.

Five Gram Members
Bhujbal Vs Vikhe :भुजबळांबाबत विखे पाटलांचे मोठे विधान; ‘त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com