IAS Pooja Khedkar controversy : बोगस IAS पूजा खेडकर कुटुंब पुन्हा वादात; अपहरण झालेली व्यक्ती खेडकरांच्या पुण्यातील घरात सापडली

Navi Mumbai Kidnapped Person Found at IAS Pooja Khedkar Family House in Pune : नवी मुंबईत अपहरण झालेली व्यक्ती वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या पुण्यातील घरी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
IAS Pooja Khedkar controversy
IAS Pooja Khedkar controversySarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar family Pune house : वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर खेडकर यांच्या पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? या व्यक्तीचा खेडकर कुटुंबाशी काय संबंध? या सर्व घटनांची चौकशी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.

IAS पूजा खेडकर यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून झालेली नियुक्ती वादात सापडली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नियुक्ती झाल्याचा ठपका आहे. हा वाद देशभर गाजला. यानंतर खेडकर कुटुंब आणि त्यांच्याभोवती असलेले वाद नेहमीच चर्चेत राहिले. आता पुन्हा खेडकर कुटुंब वेगळ्याच घटनेने चर्चेत आले आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिस झालेल्या घटनेशी बारकाईने तपास करत असल्याने खेडकर कुटुंबियांची भूमिका चर्चेत आली आहे.

मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमाकांच्या कारचा शनिवारी सायंकाळी अपघात (Accident) झाला. ट्रकचालक चंदकुमार चव्हाण आणि त्याचा हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे ट्रकामध्ये होते. कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. अपघातानंतर दोन्ही बाजूने वाद झाला. ट्रकमधील हेल्पर प्रल्हाद कुमार याला कारमधील दोघांनी जबरदस्तीने त्यांच्यासोबत बसून घेतले.

IAS Pooja Khedkar controversy
Bihar election issues 2025 : बिहार निवडणुकीत युवा स्थलांतराचा मुद्दा तापला! दरवर्षी किती युवक स्थलांतर करता?

यानंतर कारमागे ट्रक आणण्याच्या सूचना ट्रक चालक चंदकुमार याला केल्या. ट्रक चालक कारमागे ट्रक घेऊन चालला होता. पण पुढे काही वेळाने कार ट्रक चालकाच्या नजरेआड झाली. या प्रकाराने गोंधळलेल्या ट्रक चालक चंदकुमार याने मालक विलास ढेंगरे यांना दिली. ढेंगरे यांनी नवी मुंबईच्या रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दिली.

IAS Pooja Khedkar controversy
BJP MP Ujjwal Nikam legal notice : उज्ज्वल निकमांची नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत लीगल नोटीस

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ तपास सुरू केला. कारचा MH 12 RP 5000 शोध घेतला. ही कार पुण्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या घरी उभी असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबई पोलिसांचे पथक कारवाई करत तिथं पोचले. तेव्हा पूजा खेडकर यांच्या आईने घराचे प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. पोलिसांनी मात्र कारवाई सुरूच ठेवली. यानंतर खेडकर कुटुंबांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार समोर आला. त्याची पोलिसांनी सुटका केली.

नवी मुंबईतून अपहरण झालेल्या ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार खेडकर कुटुंबांच्या घरी कसा पोहोचला या प्रश्नाबरोबर अनेक गंभीर मुद्दे या घटनेमुळे खेडकर कुटुंबाभोवती उपस्थित झाले आहेत. अपघातामधील कार कशी ताब्यात आली? कार चालवणारे दोघे कोण होते? खेडकर कुटुंबांशी त्यांचा काय संबंध? या घटनेची खेडकर कुटुंबांचे काय कनेक्शन? अने अनेक प्रश्न या घटनेमुळे खेडकर कुटुंबाभोवती नवी मुंबई पोलिसांनी उभे केले आहे.

खेडकर कुटुंब वेगवेगळ्या अडचणीने राज्यभर चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा अपहरण प्रकरण समोर आल्याने खेडकर कुटुंबाची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याचा नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे प्रकरणामुळे वादग्रस्त खेडकर कुटुंबांच्या पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com