Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बारामतीचा अभेद्य गड सर करण्यासाठी भाजपने ओबीसी कार्ड काढले असून यासाठी भाजपने प्रदेश सचिव असलेल्या नवनाथ पडळकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा प्रभारी म्हणून पडळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाज अधिक आहे. त्यामध्येही धनगर समाजाचे मतदान लक्षणीय आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले असून सध्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे येथून नेतृत्व करत आहेत. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी व्युहरचना भाजपच्या केंद्र पातळीवरील नेत्यांनी आखली आहे. त्यासाठी गेल्या महिन्यापासून भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरूवात देखील केलेली आहे
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपकडून बारामती लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेले नवनाथ पडळकर हे फेब्रुवारी 2023 मध्ये पक्षात दाखल झाले आहे. इंजीनिअर, एम.ए पॅालिटिक्स, एलएलबी असे शिक्षण त्यांचे आहे. राजकीय पक्षाची पार्श्वभूमी त्यांची आहे. पडळकर हे 2019 च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर भाजपच्या उमेदवाराला दोन क्रमांकाची मते होती. बारामती लोकसभा निवडणुकीचा त्यांना अनुभव असल्याने भाजपने त्यांना ही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
या मतदारसंघात 2014 आणि 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच झुंजविले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये सुळे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना जोर लावावा लागला होता. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे वरिष्ठ आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा लढविणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी स्वतः दिले होते. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देत सत्तेत सहभागी झाले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पडळकरांवर दिलेली ही जबाबदारी महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.
(Edited By - Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.