Pravin Gedam : कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट; सायबर क्राईमकडे तक्रार

IAS Pravin Gedam News : कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार न करण्याचे आयएएस अधिकाऱ्यांचे आवाहन
pravin Gedam
pravin Gedam Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे कृषी आयुक्त, हाय प्रोफाईल आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम (Pravin Gedam) यांच्या नावाचे कोणीतरी बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले असल्याची माहिती डॉ. गेडाम यांनी फेसबुकवर दिली आहे. हे बनावट अकाऊंट रिपोर्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार अनेकांनी ते रिपोर्ट केले, मात्र, मानकांचे उल्लंघन झाले नाही, असे म्हणत फेसबुकने ते बनावट अकाऊंट बंद केलेले नाही. त्यामुळे डॉ. गेडाम यांनी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

काही दिवसांपासून प्रशासकीय, पोलिस अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. अधिकाऱ्यांचे अकाऊंट हॅक करून त्यांच्या मित्रयादीतील लोकांकडे पैशांची मागणी केली जाते. काहीजण त्याला बळी पडू शकतात. त्यामुळे अकाऊंट हॅक झाले की अधिकारी तसे कळवतात, बनावट अकाऊंटला प्रतिसाद न देण्याचे आवाहन करतात. डॉ. गेडाम यांनीही त्यांच्या बनावट अकाऊंटपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Koustubh Diwegavnkar) यांचेही अकाऊंट हॅक झाले होते. त्यांच्या बनावट अकाऊंटद्वारे त्यांच्या मित्रयादीतील काही जणांकडे पैशांची मागणी करण्यात आली. दिवेगावकर यांनी आधीच त्याची माहिती दिली होती. त्यामुळे कोणाचाही फसवणूक झाली नाही.

pravin Gedam
Bawankule News : बावनकुळेंकडून अजितदादांची पाठराखण, भाजप पदाधिकाऱ्यांनाच सुनावले.

डॉ. गेडाम हे 2002 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते मूळचे नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आतापर्यंत जळगाव, लातूर, धाराशिव, सोलापूर, नाशिक, मुंबई आणि दिल्ली येथे काम केले आहे. जळगाव येथे महापालिकेचे आयुक्त आणि धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली होती. नाशिक येथे महापालिकेच्या एका प्रकारणात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ते प्रकरण डॉ. गेडाम हे नाशिक महापालिकेचे आयुक्त असताना घडलेले होते. त्यामुळे डॉ. गेडाम यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. सध्या ते पुणे येथे राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

नाशिक महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी घरकुल घोटाळा उघडकीस आणला होता. त्या प्रकरणात पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी स्वतः एफआयआर लिहिला होता. तो इतका परिपूर्ण होता की त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी सुरेशदादा जैन यांना पुढे अनेक वर्षे जामीन मिळाला नव्हता. विशेष म्हणजे, त्या काळात 2 जी घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळाला होता, मात्र घरकुल घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळाला नव्हता. तेथून त्यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती.

महापालिकेतून जाताना त्यांनी लॅपटॉप जमा केला नाही म्हणून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लॅपटॉप परत करताना कशा अडचणी आणण्यात आल्या, तो कसा मुद्दाम जमा करून घेण्यात आला नाही, हे डॉ. गेडाम यांनी पुराव्यांसह स्पष्ट केले होते. त्यामुळे हे प्रकरण दाखल करणारे तोंडघशी पडले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

gedam's facebook  post
gedam's facebook post sarkarnama

लातूरहून ते जिल्हाधिकारी म्हणून उस्मानाबादला आले. तेथे त्यांनी पूर्वकल्पना देऊन कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान राबवले होते. रेशन धान्याचे सामाजिक लेखापरीक्षण केले होते. बनावट प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक स्वस्त धान्य दुकानांचे परवाने त्यांनी रद्द केले होते. तेथून सोलापूर जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आय़ुक्त, परिवहन विभागाचे आय़ुक्त असा प्रवास करत डेप्युटेशनवर केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाले होते. अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात सहा महिन्यांचा सार्वजनिक आरोग्याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते यंदा जूनमध्ये महाराष्ट्रात परतले. त्यानंतर त्यांची कृषी आय़ुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बनावट अकाऊंट बंद करण्यास फेसबुकचा नकार

दोन दिवसांपूर्वीच त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकाऊंट रिपोर्ट करावे आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार अनेकांनी ते अकाऊंट रिपोर्ट केले मात्र, मानकांचे उल्लंघन झाले नाही म्हणत ते बनावट अकाऊंट बंद करण्यास फेसबुकने नकार दिला. त्यामुळे डॉ. गेडाम यांनी आता सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली आहे. या बनावट अकाऊंटशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करून नयेत, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

pravin Gedam
IAS Pravin Gedam : धडाकेबाज तुकाराम मुंढेंनंतर कृषी खात्यात धनूभाऊंनी बोलावले डॅशिंग प्रवीण गेडामांना

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com