काँग्रेस आमदाराने लावले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गळाला!

कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस पक्ष नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास आमदार थोपटे यांनी व्यक्त केला.
Sangram thopte
Sangram thopteSarkarnama

भोर (जि. पुणे) : भोर तालुक्याच्या हिर्डोशी खोऱ्यातील विविध गावांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. निगुडघर येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे कॉंग्रेस पक्षात स्वागत केले. (NCP Activist's from Bhor taluka joined the Congress party)

तालुक्यातील निगुडघर, वडतुंबी, चिखलगाव, आंबवडे, म्हसर व इतर गावांमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रमुख कार्यकर्त्यामध्ये गणपत मांढरे, आप्पा सातपुते, अरविंद बांदल, रामचंद्र बांदल, शंकर भावेकर, सीताराम भावेकर, कांताराम भावेकर, विलास बांदल, आनंदा भिलारे, वसंत गायकवाड, नामदेव म्ह्सूरकर, संपतराव धोंडे, रामदास धोंडे, चंद्रकांत साळेकर, आप्पा बिंगरुट जगन्नाथ साळेकर आदींचा समावेश आहे.

Sangram thopte
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, हिर्डोशी खोऱ्यातील प्रत्येक गावात काँग्रेसमार्फत विकासकामे केली असून यापुढील काळातही रस्ते, सिंचन योजना, शेतीपिकांचे झालेले नुकसान, कोंढरी व धानवली गावचे पुनर्वसन ही कामे मार्गी लावणार आहे. या विकासकामांच्या व सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस पक्ष नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास आमदार थोपटे यांनी व्यक्त केला.

Sangram thopte
नंदूरबारला काँग्रेस-शिवसेना सत्तेत तर भाजप राहणार उन्हात!

या कार्यक्रमास कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहान बाठे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, पोपटराव सुके, विठ्ठल कुडले, आनंद आंबवले, अनिल सावले, सुभाषराव कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव नांटबे, पांडुरंग धोंडे, लक्ष्मण पारठे आदींसह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com