Attack On Rupali Patil : राष्ट्रवादीच्या रूपाली पाटलांवर भोरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं ?

Pune Politics : सुमारे दोन किलोमीटर झालेल्या पाठलागाने संतापलेल्या रूपाली पाटलांनी त्या दोघांना चांगलेच धारेवर धरले. त्यानी दोघांची नेमकी ओळख काय, ते कोठून आले, याची विचारणा केली.
Rupali Patil
Rupali PatilSarkarnama

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या आणि पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्या गाडीची पाळत ठेवून दोघांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी रात्री भोर परिसरात घडला आहे. संबंधित दोघांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याची शंका रूपाली पाटलांनी व्यक्त केली आहे. मात्र या प्रकारानंतर पाटील यांनी पोलिसांत कुठल्याही प्रकारची तक्रार दिली नसल्याने नक्की काय झाले, हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.

रूपाली पाटील या शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यातून भोरला निघाल्या होत्या. त्या पुण्यापासून काही अंतर पुढे गेल्या असता सुमारे दोन किलोमीटरपर्यंत त्यांच्या गाडीचा दुचाकीस्वारांनी पाठलाग सुरू केला. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली गाडी वेगाने पुढे नेत लोकवस्तीच्या परिसरात थांबवली. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली.

रूपाली पाटलांनी Rupali Patil दुचाकीस्वारांना, पाठलाग करीत आहात का, असा जाब विचारला होता. पाटील यांच्या प्रश्नानंतर दोघांनी आपली बाजू मांडली. मात्र सुमारे दोन किलोमीटर झालेल्या पाठलागाने संतापलेल्या रूपाली पाटलांनी त्या दोघांना चांगलेच धारेवर धरले. त्यानी दोघांची नेमकी ओळख काय, ते कोठून आले, याची विचारणा केली. यावेळी त्यांच्यातील वाद चांगलाच वाढला.

हा वाद पाहून पाटील यांच्या मदतीसाठी परिसरातील लोक धावून आले. त्यांनी दुचाकीवरील दोघांना दम भरला. लोकांच्या मध्यस्थीने हा वाद थोडक्यात आटोपल्याचे समजते. मात्र राजकीय कारस्थान असू शकते, अशी शंका रूपाली पाटील यांनी उपस्थित केली. याबाबत त्यांनी पोलिसांकडे कुठचीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, की ओव्हरटेक करण्यावरून हा प्रकार घडला हे अद्याप उघड झालेले नाही.

Rupali Patil
NDA Politics : नितीशकुमार अन् चंद्राबाबू 'या' मागणीसाठी पंतप्रधान मोदींची डोकेदुखी वाढवणार..?

लोकसभा निवडणुकीपासून रूपाली पाटील या नेहमीच चर्चेत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांवर आरोप केले होते. त्याला रूपाली पाटील यांनी सडेतोड उत्तरे दिलेली आहेत. त्याशिवाय त्या नेहमीच विरोधकांवर टीका करतात.

याच काळात रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करावा, असे ट्विट उपनेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी केले होते. त्यामुळे त्या राज्यात चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करणार का याची उत्सुकता होती. मात्र रूपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन आपण राष्ट्रवादीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. आता याच रूपाली पाटलांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला की ओव्हरटेक करण्यावरून वादाची घटना घडली, हे स्पष्ट होण्यासाठी पुढचे काही तास लागतील हे निश्चित. त्यामुळे या घटनेकडे लक्ष ठेवून राहू.

Rupali Patil
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा जयंत पाटलांना खोचक टोला; 'चादर फटने वाली नहीं...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com