Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा जयंत पाटलांना खोचक टोला; 'चादर फटने वाली नहीं...'

Mahayuti Politics : आता मंत्रिमंडळ विस्तारत राज्यात आरपीआयलाला एक मंत्रिपद मिळावे. येणाऱ्या विधानपरिषदमध्ये एक जागा द्यावी. तर तीन मंडळाचे चेअरमन पद आरपीआय पक्षाला द्यावे
Ramdas Athawale, Jayant Patil
Ramdas Athawale, Jayant PatilSarkarnama

Maharashtra Political News : वित्तमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. या योजना आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी चादर लगी फटने खैरात लगी बटने, अशा शब्दांत अर्थसंकल्पाची चिरफाड केली. त्याला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.

रामदास आठवलेंनी Ramdas Athawale अर्थसंकल्पातून राज्यातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिला, मुली आणि विद्यार्थिनींसाठी चांगल्या योजना राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे 'चादर हमारी फटने वाली नहीं है और देवेंद्र फडणवीस हटने वाले नहीं है', असा जयंत पाटलांना टोला लगावत आठवलेंनी विधानसभेत महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वासच व्यक्त केला आहे.

अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. त्या अनुषंगाने आठवलेंनी महायुतीपुढे काही प्रस्तावही ठेवले आहेत. ते म्हणाले, आता मंत्रिमंडळ विस्तारत राज्यात आरपीआयलाला एक मंत्रिपद मिळावे. येणाऱ्या विधानपरिषदमध्ये एक जागा द्यावी. तर तीन मंडळाचे चेअरमन पद आरपीआय पक्षाला द्यावे ही मागणी पक्षाकडून केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale, Jayant Patil
Uddhav Thackeray Shivsena : ठाकरे गटात Incoming सुरू ; 'या' माजी आमदाराची लवकरच घरवापसी ?

लोकसभा निवडणुकीत आम्ही मन लावून काम केले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. यात आरपीआयचा मोठा वाटा होता. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या आरपीआय पक्षाला 8-10 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Ramdas Athawale, Jayant Patil
Video Crop Insurance Scam : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची लूट; धनंजय मुंडे संतापले, 'आता कुणाचीही गय...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com