Sharad Pawar On Ajitdada : पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती; पवारांचा गौप्यस्फोट

NCP NEWS म्हणून त्यावेळी अजित पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama

Satara News : पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी ‘जे काही झालं ते योग्य नाही. आमच्याकडून योग्य काम झालं नाही,’ अशी कबुली देण्यात आली होती. तसेच, पुन्हा त्या रस्त्याने (भाजपसोबत) जायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतरच पक्षाने त्यांना संधी दिली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. (After the morning oath ceremony, it was decided not to go with BJP again: Sharad Pawar)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज सायंकाळी कोल्हापुरात सभा होणार आहे. त्या सभेपूर्वी पवारांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. दहिवडीत पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने एकदा-दोनदा एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती करेक्ट केली असेल तर एक संधी द्यावी; म्हणून पक्षाने यापूर्वी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेतला होता.

Ajit Pawar-Sharad Pawar
Bacchu kadu Angry On This Banner : पवारांच्या ‘बाप बाप होता है!’ बॅनरवर बच्चू कडू संतापले; ‘असे गद्दार आज अनेक पक्षांत...’

एकदा दोन लोकांचा पहाटेचा शपथविधी झाला होता, त्यात एक आमचे सहकारी होते. त्यावेळी आम्ही निर्णय आधी घेतला होता. जे काही झालं, ते योग्य नाही. आमच्याकडून योग्य काम झालं नाही,’ अशी कबुली देऊन ‘पुन्हा त्या रस्त्याने जायचे नाही,’ अशी भूमिकाही अजित पवार यांनी घेतली होती, त्यानंतर एक संधी द्यावी; म्हणून त्यावेळी अजित पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Sharad Pawar
Bacchu Kadu Attack on Pawar : ...हा तर राष्ट्रवादीचा मोठा गेम, डोकं फुटायची वेळ येईल; पवारांच्या विधानावर बच्चू कडूंचा प्रहार

उपमुख्यमंत्री अजित पवार परत आले तर संधी देणार का प्रश्नावर शरद पवार यांनी सूचक भाष्य केले. ते म्हणाले की, संधी फार मागायची नसते आणि संधी फार द्यायचीही नसते. मागितली तर पुन्हा संधी द्यायची नसते. असे सांगूनही यापुढे अजित पवार यांना संधी नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com