Manipur Viral Video : 'आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी..' ; मणिपूर घटनेवर मुख्यमंत्री बिरेन सिंहांचे मोठे विधान!

Manipur Viral Video News : "आपल्या समाजात अशा घृणास्पद कृत्यांना अजिबात स्थान नाही."
CM N Biren Singh
CM N Biren SinghSarkarnama
Published on
Updated on

CM N Biren Singh On Manipur Violence : मणिपूरमधील हिंसक घटनांच्या मालिकेने गुरूवारी वेगळेच वळण घेतले. त्यातून दोन महिलांवरील अत्याचाराबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून संसदेत विरोधक पक्ष आक्रमक होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घटनेची गंभीर दखल घेत, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Latest Marathi News)

CM N Biren Singh
PM Modi On Manipur Incident : 'चुकीला माफी नाही; मणिपूर घटनेतील दोषींना अद्दल घडवणार', पंतप्रधान मोदी संतापले !

मुख्यमंत्री बिरेन सिंह या घटनेबाबत बोलताना म्हणाले, "हे अत्यंत अपमानास्पद आणि अमानवी असे कृत्य आहे. त्या दोन महिलांबाबत माझ्याही संवेदना आहेत. या अत्याचाराबाबतचा व्हिडिओ काल माझ्याकडे आला. व्हिडिओ येताच या घटनेची मी स्वत:हून दखल घेतली आहे. मणिपूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून, संबंधित घटनेतील काही आरोपींनी अटक केली आहे. (latest marathi news)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "सध्या या घटनेच्या प्रकरणी चौकशी सुरू केलेली आहे. आरोपींनी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आरोपींना फाशीच्या शिक्षेचा होण्याबाबत आम्ही विचार करु. आपल्या समाजात अशा घृणास्पद कृत्यांना अजिबात स्थान नाही," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

CM N Biren Singh
Raju Shetty : माझा `इंडिया` आणि `एनडीए` दोघांशीही संबंध नाही!

या घटनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्वत:हून दखल घेत कठोर टिप्पणी केली आहे. 'मणिपूरच्या या घटनेबाबत सरकारने कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू,' असे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले. 'आतापर्यंत काय कारवाई झाली', याबाबत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. आता पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com