NCP Crisis And Pune : पुणे जिल्ह्यातील भूमिका स्पष्ट न केलेले आमदार आता 'नॉट रिचेबल'

Chetan Tupe On NCP Split : शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार
Chetan Tupe
Chetan TupeSarkarnama
Published on
Updated on

NCP And Chetan Tupe : राज्याच्या राजकारणात वर्षभरातच रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांना धक्का दिला. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Latest Political Marathi News)

Chetan Tupe
Nilesh Lanke On NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर निलेश लंके भावनिक; म्हणाले, "माझे कुटुंबप्रमुख..."

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोण कोणत्या गटात असणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, या आमदारांच्या गटाची यादी समोर आली आहे. आता आपल्या गटाचे संख्याबळ स्पष्ट करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही आपापल्या समर्थक आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या या बैठका बुधवारी (ता. ५ जुलै) रोजी होणार आहेत.

Chetan Tupe
NCP Split News : दादा की साहेब ! राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुठल्या गटाचे जास्त वजन; 'या' दिवशी होणार स्पष्ट

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुणे जिल्ह्यातील भूमिका स्पष्ट नसेलेले एकमेव आमदार चेतन तुपे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर रविवारी (ता. २) आपण अजित पवार की शरद पवार कुणासोबत जाणार हे स्पष्ट केले नव्हते. सध्या मात्र चेतन तुपे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे लवकरच ते कुठल्या गटात असतील हे स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर सर्व आमदार अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडरा पडल्याचे बोलले जात आहे.

Chetan Tupe
Maharashtra NCP Crisis : निर्णय अजितदादांचा..,कोंडी निष्ठावंतांची ; शशिकांत शिंदे म्हणाले, 'सलोख्याचे संबंध तुटले..'

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बुधवारी बोलावली आहे. ही बैठक वांद्य्रातील मॅट कॉलेजमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याच दिवशी शरद पवार यांच्याही समर्थक आमदारांच्या बैठकीचे आयोजन आहे. शरद पवार वाय.बी. सेंटरमध्ये ही बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतरच राष्ट्रावादी काँग्रेसमधील साहेब की दादा या गटापैकी कोणत्या गटाला जास्त समर्थन मिळाले, कुणाचे जास्त आमदार आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com