NCP And Nilesh Lanke : राज्याच्या राजकारणात वर्षभरातच रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांना धक्का दिला. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Latest Political Marathi News)
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोण कोणत्या गटात असणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, या आमदारांच्या गटाची यादी समोर आली आहे. आता आपल्या गटाचे संख्याबळ स्पष्ट करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही एक बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या या बैठका बुधवारी (ता. ५ जुलै) रोजी होणार आहेत.
दरम्यान, अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेत्यांनी एकत्र राहावे, अशी भूमिका व्यक्त केली आहे.
निलेश लंके म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे आमचे नेते व कुटुंबप्रमुख आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो!"
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.