NCP Crisis And Pune MLAs : आधी अजितदादांवर टीका, नंतर दिली साथ; पुण्यातील 'या' आमदाराचा 'यू टर्न'

MLA Dilip Mohite Patil Is With Ajit Pawar : दिलीप मोहिते यांनी शरद पवारांवरही केली होती टीका
Ajit Pawar, Dilip Mohite
Ajit Pawar, Dilip MohiteSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra NPC Politics : राज्यमंत्री करतो, असा शब्द देऊनही अजितदादांनी तो पाळला नाही. तर आपले कट्टर पक्षांतर्गत विरोधक आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांना मंत्री केले. यावरून खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी (ता. ३) अजितदादांवर कडाडून हल्लाबोल केला होता. यानंतर यू टर्न घेत ते पुन्हा अजित पवार यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भूवया उंचावल्या आहेत. (Latest Political News)

राज्यात रविवारी (ता. २ जुलै) राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. यातील कुठल्या गटात सहभागी व्हायचे याबाबत अनेक आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या फुटीनंतर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता मात्र त्यांनी अजितदादांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar, Dilip Mohite
NCP Crisis Vs Shivsena Crisis : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात काय आहे साम्य आणि वेगळेपण...?

आमदार मोहिते आणि खेड तालुका राष्ट्रवादीने मंगळवारी (ता. ४) अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून ते आज बुधवारी (ता. ५) अजितदादांच्या मुंबईतील बैठकीसाठी आपल्या शंभरेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह हजर राहिले. एवढेच नाही, तर ती संपल्यानंतर लक्झरी बसमधून फाईव्ह स्टार हॉटेलला जाताना त्यांनी अजित पवार यांच्यासोबत एका सीटवर बसून प्रवासही केला. त्यातून त्यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या बंडात त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे २ जुलैला सांगणाऱ्या आमदार मोहितेंनी २४ तासांत यू टर्न घेतला होता. पदाधिकारी,कार्यकर्ते आणि खेडची जनता यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी दुसऱ्या दिवशी (ता. ३) सांगितले होते.

यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवारांसह वळसेंवर कडाडून हल्लाबोल केला. तसेच २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांनीच आमदारांना भाजपबरोबर जाण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोटही केला होता. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान, मोहिते यांनी खेड येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादांबरोबर जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी 'सरकारनामा'ला दिली.

Ajit Pawar, Dilip Mohite
Sharad Pawar And PULOD : 'पुलोद'चा प्रयोग बरोबरच, तर...; शरद पवारांनी ठणकावलं

तिन्ही 'अण्णा' आमदार अजितदादांसोबत

दरम्यान, खेडचे आमदार दिलीपअण्णा मोहिते यांच्यापूर्वी मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके मंगळवारीच मुंबईला गेले होते. ते ही अजितदादांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील तिसरे अण्णा आमदार पिंपरीचे अण्णा बनसोडे हे रविवारपासूनच मुंबईत आहेत. अजितदांदांच्या पहिल्या बंडातही ते शेवटपर्यंत दादांसोबत राहिले होते. दुसऱ्या बंडातही रविवारपासून त्यांनी मुंबई सोडलेली नाही. दादांच्या आजच्या बैठकीला ते ही हजर होते.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com