गृहमंत्र्यांच्या धामारीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा!

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील धामारी येथे शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) यांच्यात प्रत्येक निवडणुकीत चुरशीची असते.
NCP leader
NCP leadersarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर : आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील धामारी (ता. शिरूर) येथे शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) अशी जोरदार धुमचक्री प्रत्येक निवडणुकीत सुरू असते. वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत शिवसेनेने केवळ एकाच्या फरकाने राखली होती. मात्र, त्याचेच उट्टे काढत राष्ट्रवादीने गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत १२: ०० असा एकहाती धुव्वा केला. विशेष म्हणजे मोठ्या त्वेषाने लढवलेल्या निवडणुकीच्या प्रचारानंतर धामारीकरांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा जयघोष करीत जल्लोष केला.

धामारी (ता.शिरुर) येथील धामारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खंडेराय सहकार पॅनलने शिवसेनेच्या जयमल्हार पॅनलचा १२ : ०० असा पराभव केला. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील धामारीत मागील पंचवार्षिकला निसटता विजय मिळा होता. या वेळी मात्र १०० टक्के राष्ट्रवादीमय धामारी करीत वळसे पाटलांसाठी ही अनोखी भेट देत असल्याची प्रतिक्रिया पॅनल प्रमुख शहाजी डफळ, धनंजय डफळ, कैलास डफळ, रावसाहेब वाघोले, एकनाथ डफळ यांनी दिली.

NCP leader
Supriya Sule यांना CM करण्याच्या हालचाली, या चंद्रकांतदादांच्या दाव्यावर त्या म्हणाल्या...

१३१८ सभासद, सहा कोटींची वार्षिक उलाढाल आणि अर्धा कोटींच्या सुसज्ज इमारतीसह उभ्या असलेल्या धामारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचा खंडेराय सहकार पॅनल विरुध्द शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या कट्टर समर्थकांचा, जयमल्हार पॅनल अशी थेट लढत झाली. मागील पंचवार्षिकला एका मताच्या फरकाने राष्ट्रवादीने गड राखला होता. यावेळी जयमल्हार पॅनलचे प्रचारप्रमुख माजी सरपंच संपत कापरे, दत्तोबा भगत, अजित पावसे यांनी लढत प्रतिष्ठेची केली होती. मात्र, राष्ट्रवादीने एकहाती निवडणूक जिंकत शिवसेनेच्या पॅनलचा धुव्वा उडवला. भटक्या-विमुक्तची एक जागा उमेदवारा अभावी रिकामी राहिली.

NCP leader
महिनाभर दिल्लीत थांबलो पण तिकिट नाही मिळाले : सतेज पाटलांचा आमदारकीच्या पहिल्या प्रयत्नाचा किस्सा

या निवडणुकीत बबनराव डफळ, मारुती डफळ, गुलाबराव डफळ, नवनाथ डफळ, नितिन डफळ, दत्तात्रय डफळ, शिवराम वाघोले, शांताराम पावसे, जयश्री डफळ, सत्यभामा डफळ, निवृत्ती मोहीते, अरुण कापरे आदी उमेदवार विजयी झाले. ग्रामस्थांच्या एकमुखी राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहण्याबद्दल माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, उपसभापती सविता प-हाड, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर व प्रमोद प-हाड आदींनी धामारीकरांचे विशेष आभार मानले. सदस्यांचा वळसे-पाटील यांचे हस्ते सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण निवडणुकीच्या यशात प्रचार प्रमुख शहाजी डफळ, कैलास डफळ, रावसाहेब वाघोले, एकनाथ डफळ, धनंजय डफळ, कैलास कापरे, महादेव डफळ, सुनिल डफळ व प्रतिक डफळ आदींनी विशेष योगदान दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com