Omraje Nimbalkar On his Fathers memorial day : आमदार, खासदार झालो तरी राजेसाहेब, तुमचा मुलगा हीच माझी खरी ओळख..

Marathwada : तुम्हाला अभिमान वाटावा असेच कार्य माझ्याकडून होत राहील, ही ग्वाही देतो.
Omraje Nimbalkar On his Fathers memorial day News
Omraje Nimbalkar On his Fathers memorial day NewsSarkarnama

Dharashiv : शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडिल दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचा आज स्मृतीदिन. (Omraje Nimbalkar On his Fathers memorial day) या निमित्ताने ओमराजे यांनी वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजेसाहेब तुमची पुण्याई हिच आपली ताकद असल्याचे सांगत त्यांनी पवनराजेंच्या स्मृतीस अभिवादन केले.

Omraje Nimbalkar On his Fathers memorial day News
Eknath Khadse Meets Pankaja Munde : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार ; खडसे म्हणाले ; 'संघर्षयात्री..'

आज माझे वडील पवनराजे साहेबांचा स्मृती दिन. राजेसाहेबांनी जाऊन मोठा काळ लोटला, परंतु अजूनही त्यांनी लोकांसाठी केलेले काम, लोकांबद्दलची आपुलकी, यामुळे ते कायमच जनतेच्या मनात आहेत. (Osmanabad) राजेसाहेब, मी सुद्धा तुम्ही दाखविलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमण करीत आहे. यात मला तुमच्या आशीर्वादाने लोकांची खंबीर साथ लाभत आहे.

मागे आमदार आणि आत्ता खासदार जरी असलो तरी तुमचा मुलगा म्हणून असलेली ओळखच माझी सर्वात मोठी ओळख आहे. (Shivsena) राजेसाहेब, तूम्ही दिलेली एक मोठी शिकवण कायमच दिशादर्शक आहे, ती म्हणजे पद कोणतेही असो ते मिरवण्यासाठी नव्हे तर जनतेसाठी वापरायचे आणि तेच मी करत आहे. (Omraje Nimabalkar)

तुम्हाला अभिमान वाटावा असेच कार्य माझ्याकडून होत राहील, ही ग्वाही देतो. राजेसाहेब, तुम्हाला पुण्यतिथी निमित्त शतशः नमन, अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे यांच्या पुण्यतिथी दिनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com