Supriya Sule News : नमो रोजगार मेळाव्यात नोकऱ्या दहा हजार अन् मंडप पाच कोटींचा!

Baramati Politics : काही दिवसांपूर्वी बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. या मेळाव्याची बरीच चर्चा झाली होती.
MP Supriya Sule
MP Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा सध्या बारामती मतदारसंघांमध्ये उडताना पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule News) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यात विकासकामांवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी बारामती मध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यावरून अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मॅरेथॉन सभा घेतल्याचे पाहायला मिळालं. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यावर टीका देखील करण्यात आली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मी त्याकडे फारसे बघत नाही. त्यापेक्षाही सध्या बारामतीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे पाणीप्रश्न आहे. धरणांमध्ये पाणी राहिलं नसून शेतकरी अडचणीत आला आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून या समस्या सोडवणं मला अधिक महत्त्वाचं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

MP Supriya Sule
Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा ठरणार उमेदवारांसाठी डोकेदुखी

बारामतीत झालेल्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये 43 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने (Maharashtra Govermant) दिले होते. त्यासाठी पाच कोटींचा मंडप देखील घालण्यात आला. मात्र त्या ठिकाणी अवघ्या दहा हजार नोकऱ्या मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामधील पर्मनंट नोकऱ्या किती, याचा आकडा देखील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे उर्वरित 33 हजार नोकऱ्यांचे काय झालं? की हा देखील जुमला होता, असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. हा रोजगार मेळावा (Namo Rojgar Melava) जर दहा हजार नोकऱ्यांसाठी होता, तर ते स्पष्टपणे सांगणे आवश्यक होतं, त्यामुळे या सरकारने कधीतरी खरं बोलावं, अशी टीका सुळेंनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुती सरकारकडून बारामती मध्ये समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तो त्यांचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. आमच्याकडून देखील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मी लोकसभेची निवडणूक लढणार हे मला पूर्वीपासूनच माहीत होतं. मी जेव्हा पहिली लोकसभेची निवडणूक लढले त्यावेळेस देखील निवडणुकीची तयारी दोन वर्ष आधीपासूनच सुरू केली होती. यंदा देखील पूर्वीपासूनच मी निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सध्या देशामध्ये इलेक्टोरल बॉण्ड भ्रष्टाचार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इलेक्टोरल बॉण्डमध्ये नेमकं काय झालं याबाबत व्हाईट पेपर सरकारने काढणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांवर ईडी आणि सीबीआयच्या रेड पडल्या, त्या कंपन्यांनी हे बॉण्ड खरेदी केले आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचार आहे की ब्लॅकमेलिंग आहे, हे समोर येणे गरजेचे आहे. जुगार चालवणाऱ्या कंपन्यांनी हजारो कोटींचे बॉण्ड खरेदी केले आहेत. या कंपन्यांनी हजारो कोटींचा निधी कोणाला दिला, हे जनतेच्या समोर आलं पाहिजे, असं सुळे म्हणाल्या.

MP Supriya Sule
Pune News: दोन उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला कात्रजकरांना 'कात्रजचा घाट'; 200 कोटींची घोषणा, आले मात्र 140 कोटीच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com