ईडीने त्यांना पुन्हा आवळलेलं दिसतंय; धनंजय मुंडेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका
Raj Thackeray, Dhananjay Munde
Raj Thackeray, Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

इंदापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय तेढ वाढली, असा आरोप केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

धनंजय मुंडे इंदापूरमधील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), प्रदीप गारटकर, संजय शिंदे, यशवंत माने, आदी उपस्थित होते.

Raj Thackeray, Dhananjay Munde
भरणेंना भावी आमदार म्हटल्याचा हर्षवर्धन पाटलांचा राग अजून जाईना!

या वेळी मुंडे म्हणाले, बघता-बघता मला मागची लोकसभा निवडणूक आठवली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस भाजपच्या विरोधात लढत होती. त्यावेळी महाराष्ट्रातील एक पक्ष आणि त्याचे एक नेते जे आज स्वताःला राज समजतात. त्यांनी भाजपच्या विरोधात एवढ्या सभा घेतल्या विरोधात बोलले, आणि म्हणायचे लावरे ती सिडी. त्यानंतर मी त्यांचे कालचे भाषण ऐकले. मला वाटले यांना पण ईडीची भलती मोठी मेक ठोकलेली दिसते. ज्या साहेबांची स्तृती करतांना ते थांबता थांबत नव्हते. त्यांनी काल आमच्या दैवतावर टीका केली, का? पुन्हा ईडीने त्यांना आवळलेले दिसते, अशा शब्दांत मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. म्हणून कालच्या सभेत बोलायचे राहून गेले कुठे आहे ती सिडी, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्रात देशात काही झाले की आमच्या नेतृत्वावर टीका होते. आज आपण येथे जमलेले सगले शेतकरी आहोत. आपली जात शेतकरी आहे. शेतकरी जीवंत ठेवायचा असेल तर राष्ठ्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार साहेबांचा विचार आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यावा लागेल. बाबांनो तुमचे नशिब आहे, तुमचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. इंदापूरला झाला, सरकार आल्यानंतर मामा बोलून गेले. कोरोनाच्या काळातही इंदापूर, बारामतीचा विकास सुरु होता, असेही मुंडे म्हणाले.

Raj Thackeray, Dhananjay Munde
आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान ; तर राजकारण सोडेन!

मामा तुम्ही नशिबवान आहात.. एवढा विश्वास तुमच्यावर साहेब आणि दादांनी टाकला आहे. तुम्हाला सात सात गोष्टी एकावेळी वाढायला मिळतायत. मामा तुम्हाला पण तुमच्याकाडे काय काय आहे. सात खाती माहिती नसतील, असा चिमटा त्यांनी दत्तात्रय भरणे यांना काढला. बांधकाम, सामान्य प्रशासन, जलसंधारण, दुग्ध विकास, मत्स्य विकास अशी खाती आहेत, असेही मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com