…तर, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाडा विकून खाल्ला असता!

भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शनिवारवाडा आतापर्यंत गहाण ठेवला असता किंवा विकूनही खाल्ला असता.
Shaniwar Wada
Shaniwar Wada Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सदस्य काहीही मागणी करतील, त्यांनी शनिवार वाडा द्या, म्हटले तर द्यायचा का, असे वक्तव्य पिंपरी-चिंचवडच्या (PCMC) महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी विशेष महासभा बोलावण्याच्या मागणीवर केले होते. त्याचा समाचार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे मुख्य प्रवक्ते व माजी महापौर योगेश बहल यांनी आज घेतला. महाराष्ट्र महापालिका अधिनियमात शनिवार वाड्यासंदर्भात काही तरतूद असती तर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शनिवारवाडा आतापर्यंत गहाण ठेवला असता किंवा विकूनही खाल्ला असता, असा हल्लाबोल बहल यांनी केला.

पिंपरी महापालिकेची या महिन्याची 18 फेब्रुवारीची सभा 17 मार्च 2022 पर्यंत तहकूब करण्यात आली. महापालिका 13 मार्चला विसर्जित होणार असल्याने 17 मार्चला सभा होणारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार स्थायी समिती सदस्यांनी महापालिका अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने विशेष महासभा बोलविण्याची मागणी महापौरांकडे केली होती. त्यावर त्यांनी ‘राष्ट्रवादीचे सदस्य काहीही मागणी करतील, त्यांनी शनिवार वाडा द्या, म्हटले तर द्यायचा का?’ असे वक्तव्य केले होते.

Shaniwar Wada
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा मोदींचा प्रयत्न! हेमा मालिनींचा गौप्यस्फोट

त्याला माजी महापौर बहल यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना म्हणाले, महापालिका कायद्यानुसार स्थायीच्या सदस्यांना अशी सभा बोलविण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, यावरून महापौरांनी अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार, महापौरपदाची प्रतिष्ठा घालविणारे वक्तव्य करून भाजपच्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर या कोणत्या पक्षाच्या नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांनी ते केल्याने त्यातून शहराचा अवमान झाला आहे.

Shaniwar Wada
आयपीएस रश्मी शुक्लांना दणका! बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी, नगरसेवक तसेच नेत्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून अशी बेताल वक्तव्ये सुरू आहेत. त्यात महौपौरही सामील झाल्याचा खेद आहे. या प्रकारांमुळे त्या बिथरून गेल्या आहेत का? असे विचारावे लागत आहे. मागील पाच वर्षांत भाजपने सभाशाखेचे कोणतेही नियम पाळले नाहीत. मनासारख्या सभा चालविल्या, अधिनियमाचे पालन केले नाही. विशेष हितसंबंधांचे तसेच पाहिजे ते विषय अक्षरशः रेटून नेले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपला मतदार नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील, असे बहल यांनी नमूद केले. तसेच विशेष महासभा न बोलवल्यास पालिकेसमोर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा लेखी इशाराही त्यांनी महापौरांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com