Kolhe on Adhalrao:कट्टर राजकीय विरोधक ते पक्के मित्र; कोल्हेंकडून आढळरावांना बर्थडेच्या शुभेच्छा!

Today birthday Adhalrao News: शुभेच्छा दिल्यानंतर त्याखाली तुतारी वाजवणारा माणूस चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा, असा मजकूर लिहायला कोल्हे विसरले नाहीत.
Kolhe on Adhalrao
Kolhe on AdhalraoSarkarnama

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) हे शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत, निवडणूक प्रचारात दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक होत असतानाच त्यांच्यात असलेली राजकीय मैत्रीही अनेकदा दिसते.

शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन वेळा पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी आढळरावांचा फोटो शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आढळरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शुभेच्छाच्या खाली तुतारी वाजवणारा माणूस चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा, असा मजकूर लिहायला कोल्हे विसरले नाहीत. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कोल्हे यांनी आढळरावांनी यापूर्वी फोन करून चर्चा केली होती, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

दोन महिन्यापूर्वी दोन्ही नेत्यांची शिवनेरी गडावर भेट झाली होती. त्यावेळी कोल्हे चक्क आढळरावांच्या पाया पडले होते. त्यानंतर आढळरावांनी त्यांची पाठ थोपटली होती. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले होते.

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर कोल्हे, आढळवार एका धार्मिक कार्यक्रमात एकत्र आले होते. यात दोघांनी एकमेकांना वाकून नमस्कार केला होता.दोन दिवसापूर्वी कोल्हे यांनी आढळरावांच्या व्यवसायाबाबत टीका केली होती.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाटकं जमत नसल्याचा टोला लगावला होता. या टीकेला उत्तर देताना आढळरावांनी नाटकं जमत नाहीत हे खरं आहे, मात्र, त्यांना जनतेच्या मतांवर संसदेत जाऊन धंदा करता येतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली होती.

Kolhe on Adhalrao
Akash Anand: मायावतींनी अपरिपक्व भाच्याला पदावरून हटवलं; पाच महिन्यापूर्वी केलं होतं उत्तराधिकारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com