Amol Kolhe Post On Book Day: 'त्या' पोस्टमधून अमोल कोल्हेंना काय सुचवायचं होतं?; स्वत:च केला मोठा खुलासा!

NCP News : अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती.
Amol Kolhe Post On Book Day
Amol Kolhe Post On Book DaySarkarnama
Published on
Updated on

Political News : गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही ते फारसे दिसत नाहीत. अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

असे असतानाच रविवारी अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण अखेर त्यांनी याबाबत आज एका कार्यक्रमात बोलताना आपल्या पोस्टबाबत खुलासा केला आहे.

Amol Kolhe Post On Book Day
Ramtek APMC Election : राज्यात एक असलेली भाजप-शिवसेना रामटेकमध्ये आमनेसामने, केदारांशी टक्कर !

अमोल कोल्हे म्हणाले, ''माझ्या पोस्टमध्ये एक पुस्तक होतं शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकेची बोलणे' आणि दुसरं पुस्तक होतं नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी'. बातम्या लगेच सुरू झाल्या. नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? अमोल कोल्हेंना फक्त एवढंच सुचवायचं होतं की विचारधारा कुढलीही असली तरी तिचा विरोध करायचा असला तर तिचा आधी अभ्यास करावा लागतो. हे जास्त महत्वाचं आहे. हे फक्त तुमच्या वाचणातून येतं. हे तुमच्या साहित्यातून येतं. जेव्हा साहित्यातून तुमचं समाजमन हे सुसंस्कृत बनत जातं. तेव्हा न कळत राजकीय साक्षरता येते'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

काय होती अमोल कोल्हे यांची पोस्ट?

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर जागतिक पुस्तक दिनानिमित्त दोन फोटो शेअर केले होते. पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकेची बोलणे' हे पुस्तक आहे. तर दुसऱ्या फोटोत नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी' नावाचे पुस्तक आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, आता त्यांनी या पोस्टबाबत स्वत:च खुलासा केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com