Ajit Pawar Vs Amol Kolhe: 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सूचक इशारा

Shirur Loksabha: 'मी काल सांगितलं तेच फायनल, विषय संपला', अजित पवारांचा अमोल कोल्हेंना पुन्हा इशारा
Ajit Pawar and Amol Kolhe:
Ajit Pawar and Amol Kolhe:Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (25 डिसेंबर) खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका करत शिरुर लोकसभा मतदारसंघातून मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे थेट आव्हान दिले. त्यानंतर मंगळवारी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात जाऊन विकास कामांची पाहणी केली. तसेच 'मी काल सांगितलं तेच फायनल, विषय संपला', असा इशारा उपमुख्यमंत्री पवारांनी पुन्हा एकदा दिला.

उपमुख्यमंत्री पवारांच्या इशाऱ्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तातडीने भेट घेतली. या भेटीनंतर खासदार कोल्हेंनीही अजित पवारांना सूचक इशारा देत खासगीतील कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही. मात्र, 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...', मी 2019 साली जिथे होतो तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा, अशा शब्दात खासदार कोल्हेंनी अजित पवारांना सूचक इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar and Amol Kolhe:
Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'दादांनी तेव्हाच माझा कान का नाही धरला? अमोल कोल्हेंचा पलटवार

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर कोल्हेंनी या भेटीचे कारण सांगत उद्याच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं. तसेच या मोर्चात कांदा निर्यातबंदी, पीकविमा, दूधाचे दर तसेच वीज पुरवठा यासह अजून काही प्रमुख मुद्दे असणार आहेत, याबरोबरच 30 डिसेंबरला शरद पवारांची (Sharad Pawar) सभा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

अजित पवारांच्या टीकेवर कोल्हे काय म्हणाले ?

"अजित पवार (Ajit Pawar) हे मोठे नेते आहेत. मी 2019 साली जिथे होतो तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा. जी काही टीका होत आहे, त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, त्यांनी त्याचवेळी कान धरला असता तर सोप्प झालं असतं. त्यांनी आज हडपसरमध्ये विकास कामांची पाहणी केली. त्यांचा मी आभारी आहे. पण आम्ही सहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची पाहणी करुन झालेली आहे. त्यानंतर हा उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला करावा ही विनंतीही त्यांना केली होती", असं त्यांनी सांगितलं.

"अजित पवारांनी दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का? या प्रश्नावर बोलताना कोल्हे म्हणाले, "मी सर्व सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यानं आव्हान देणं हे मी माझा गौरव समजेन. दादा आमचे नेते होते, त्यामुळे त्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देणं योग्य नाही. त्यांचा व्यक्ती म्हणून कायमच आदर राहिल. राजकीय भूमिका आता वेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांचं काही विधान असेल तर मी त्यांना भेटून समजून घेईल", असं कोल्हे म्हणाले.

"खासगीत जी चर्चा होते, ती चर्चा सार्वजनिक करायची नसते. हा एक संकेत आहे. त्यामुळे माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर मी खासगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणात सार्वजनिक केली असेल तर माझ्या साऱख्या लहान कार्यकर्त्याने खासगीतील चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही. कारण मी चार-साडेचार वर्ष त्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे, असंही ते म्हणाले.

खरंच तुम्ही राजीनामा द्यायला गेले होते का ?

अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर खरंच तुम्ही राजीनामा द्यायला गेले होते का ? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता कोल्हे म्हणाले, "असं म्हणतात ना बात 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...', असं म्हणत मला त्यांच्याबाबत जास्त बोलणं उचित वाटत नाही", अशी प्रतिक्रिया देत सूचक इशारा दिला.

(Edited By - Ganesh Thombare)

Ajit Pawar and Amol Kolhe:
Dr. Amol Kolhe: अजितदादांच्या चॅलेंजवर अमोल कोल्हेंचं सूचक विधान; म्हणाले, 'खासगीत बोलणं...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com