Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'दादांनी तेव्हाच माझा कान का नाही धरला? अमोल कोल्हेंचा पलटवार

Shirur Political News : "बात निकलेगी तो दूर तलक जायेगी..."
Ajit Pawar Vs Amol Kolhe :
Ajit Pawar Vs Amol Kolhe :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर काल (25 डिसेंबर) नाव न घेता टीका केली होती. शिरुर लोकसभा मतदारसंघातून मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे ओपन चॅलेन्ज त्यांनी कोल्हेंना दिले होते. त्यानंतर आज, मंगळवारी (26 डिसेंबर) अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसरमध्ये सकाळीच येत विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर 'मी काल सांगितलं तेच फायनल, विषय संपला', असा इशारा पुन्हा एकदा कोल्हे यांना दिला. (Latest Marathi News)

Ajit Pawar Vs Amol Kolhe :
NCP State President : अजितदादांची इच्छा असेल तरच मी प्रदेशाध्यक्ष होतो; जयंतरावांनी पवारांपुढे ठेवली होती अट

यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी तातडीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी', असा डॉयलॉग म्हणत, अजित पवारांना इशारा दिला. 'अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की, दादांनी तेव्हाच माझा कान का धरला नाही? आता राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांनी माझ्यावर टीका केली', असा पलटवार खासदार कोल्हे यांनी केला.

Ajit Pawar Vs Amol Kolhe :
Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या विरोधात वर्षभरापूर्वी नाराजी, आताही महाआघाडी पुढे असल्याने भाजप चिंतेत!

शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार -

अमोल कोल्हे यांनी उद्यापासून (27 डिसेंबर) सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू कऱणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी, पीकविमा यासंदर्भातले प्रश्न घेऊन मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्यापासून म्हणजे 27 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान हा आक्रोश मोर्चा आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून मोर्चाला सुरूवात होणार असून, कांदा प्रश्न, पिक विमा, दुधाचे दर, शेतकऱ्यांना कर्जमाफी याशिवाय इतर मागण्या केल्या जातील.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com