पक्षश्रेष्ठींना सांगून आम्ही मतांचा विक्रम केलाय, आता बॅंकेचे अध्यक्षपद पवारांकडे द्या

अशोक पवार यांच्या जिल्हा बॅंक निवडणुकीचे नियोजन मागील दोन वर्षांपूर्वीच ठरविल्याचा गौप्यस्फोट या कार्यक्रमात करण्यात आला.
Ashok Pawar

Ashok Pawar

sarkarnama

Published on
Updated on

सणसवाडी (जि. पुणे ) : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांच्याकडे आपण स्वत: पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची मागणी केली आहे. दोन्ही नेत्यांनी सांगितल्यानुसार शिरुर-हवेली आणि आंबेगाव-शिरुर या दोन्ही मतदार संघातून तब्बल १३१ पैकी १०९ मते आमदार अशोक पवारांच्या (ashok pawar) पारड्यात आम्ही शिरूरकरांनी टाकली आहे. आता शिरुरला म्हणजेच आमदार पवारांना जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी शिरूर बाजार समितीचे माजी सभापती आणि घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली. ही मागणी सभापती मोनिका हरगुडे, राजेंद्र नरवडे आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनीही जाहीर सभेत केली. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. (NCP office bearers demand to make MLA Ashok Pawar chairman of Pune District Bank)

पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांच्या वतीने सणसवाडी (ता. शिरूर) येथे जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून निवडून आलेले आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार तसेच तालुक्यातील सर्व १३१ मतदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात पवार यांच्या हस्ते आरती व पुजा करुन सणसवाडी चौकासह महामार्गावर पवार यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात माजी सभापती पवार यांनी तालुक्याला जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केल्याचे सांगून टाकले.

Ashok Pawar

अजितदादांना टक्कर देणाऱ्या कंदांना फडणवीसांचे भोजनाचे निमंत्रण!

या शिवाय बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरुर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर, शिरुर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, जातेगाव खुर्द सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ मतदार मच्छिंद्रबापू मासळकर यांनी अशोक पवारांचे प्रशासकीय कौशल्य जाहरीपणे सांगितले. पवार यांना अध्यक्ष करुन शिरुरकरांना न्याय देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

Ashok Pawar

महिलांच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे; आशा बुचकेंचा दारूण पराभव

सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार म्हणाल्या की, मतदारांनी जो विश्वास आम्हा पवार परिवारावर दाखविला आहे, त्याबद्दल मी संपूर्ण तालुक्याचे ऋणी आहे. मी लवकरच जिल्हा बॅंकेच्या सर्व मतदारांच्या घरी जाऊन पेढे देणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Ashok Pawar

अजित पवारांसह तीन मंत्री, चार सत्ताधारी आमदारांच्या तालुक्यांनीच जिंकवले प्रदीप कंदांना!

आमदार पवार म्हणाले की, विधानसभेसह जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपर्यंत जो एकहाती विश्वास शिरुरच्या मतदारांनी माझ्यावर दाखविला, त्याबद्दल आपण सर्वांचेच ऋणी आहोत. अध्यक्षपदाच्या कामात एकाच ठिकाणी अडकण्यापेक्षा सामान्यजनांच्या प्रत्येक अडचणींसाठी मी उपलब्ध असावे, हीच माझी मनोमन भावना आहे.

Ashok Pawar

राजकीय हिशेब चुकते करण्यास एकत्र आलेल्या विरोधकांना पवारांनी दाखवला कात्रजचा घाट!

कार्यक्रमाला सणसवाडीच्या सरपंच सुनीता दरेकर, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सविता बगाटे, दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, सुजाता नरवडे, ललिता दरेकर, सदाशिवराव पवार, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, स्वप्निल गायकवाड, शशिकांत दसगुडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शेखर पाचुंदकर, विठ्ठलआप्पा ढेरंगे, पी. के. आण्णा गव्हाणे, राजेंद्र दरेकर आदी उपस्थित होते.

Ashok Pawar

निर्मला जागडेंच्या विजयाने वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाले दोन संचालक!

बाळासाहेब नरकेंचा गौप्यस्फोट

जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी अशोक पवार यांच्या जिल्हा बॅंक निवडणुकीचे नियोजन मागील दोन वर्षांपूर्वीच ठरविल्याचा गौप्यस्फोट या कार्यक्रमात केला. तालुक्याने तब्बल ४१ हजारांचे मताधिक्य दिल्याने आमदार पवारांची राजकीय, प्रशासकीय क्षमता सिध्द झाली होती. त्याच वेळी आम्ही खासगीत अशोक पवार यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याबाबत सुचविले होते. त्या पद्धतीने पवार कामाला लागले आणि ते जिल्हा बॅंकेत पोचले, असे नरके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com