Dilip Walse Patil: अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या भेटीला जाणार? दिलीप वळसे पाटील म्हणाले...

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.त्यातच त्यांनी अजित पवारांसह भाजपला धक्क्यावर धक्के देण्यातही त्यांनी कसर सोडलेली नाही.यातच आता माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून दिलीप वळसे पाटील यांची राज्याच्या राजकारणात ओळख होती.पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिली.

त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) बंडखोरी केलेल्या नेत्यांचा त्यांच्याच मतदारसंघात बंदोबस्त करण्यासाठी आपले एक एक हुकमी पत्ते बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात मंत्री दिलीप वळसे पाटील,छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहेत.

अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वारं फिरवण्यात यशस्वी झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंगचे वारे वाहू लागले आहे.अजित पवारांसह भाजपमधील अनेक नेते पवारांच्या भेटीसाठी दाखल होत आहे.

यातच आता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हेही शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा समोर आली होती. या चर्चेमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह महायुतीत खळबळ उडाली होती.अखेर वळसे पाटलांनीच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Dilip Walse Patil
Nilesh Rane on Vaibhav Naik : 'राजकीय परिपक्वता तर या जन्मात येणं शक्य नाही, व्यक्ती म्हणून परिपक्वता कधी येणार?'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.त्यातच त्यांनी अजित पवारांसह भाजपला धक्क्यावर धक्के देण्यातही त्यांनी कसर सोडलेली नाही.यातच आता माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते दिलीप वळसे पाटीलही शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.पण दिलीप वळसे पाटलांनी ही चर्चा फेटाळळी.

दिलीप वळसे पाटील म्हणाले,आपण शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ आहेत.मीडियामध्ये आपल्या आणि पवारांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.परंतु,त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही पक्षप्रवेशाच्या चर्चा अद्याप राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरुच आहे.

Dilip Walse Patil
MLA Ramesh Karad News : आमदार रमेश कराडांचा भारीच काॅन्फिडन्स, स्वतःची उमेदवारी केली जाहीर

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जुन्नर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.तसेच आंबेगावमधून वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले होते.तर दुसरीकडे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री दिलीप वळसे पाटील नाही, तर त्यांची कन्या निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती.मात्र, ती चर्चा बिनबुडाची असल्याचे स्पष्ट करत दिलीप वळसे पाटील यांनी तेच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com