Rajalakshmi Bhosale: अजितदादांनी पुण्यातील महिला नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Rajalakshmi Bhosale Appointment NCP Spokesperson: आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसले यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव भोसले यांना आहे.
Rajalakshmi Bhosale Appointment NCP Spokesperson
Rajalakshmi Bhosale Appointment NCP SpokespersonSarkarnama
Published on
Updated on

Pune News: स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्यावर अजित पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी राजलक्ष्मी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसले यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव भोसले यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

1997च्या महापालिका निवडणुकीत त्या पहिल्यांदा निवडून आल्या.2002 मध्ये आणि 2007 च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. त्यानंतर 2007 मध्ये त्या महापौर झाल्या. जुलै 2019 मध्ये राजलक्ष्मी भोसले यांचे "माझे जीवन, माझे व्हिजन'ही आत्मकथा प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.

Rajalakshmi Bhosale Appointment NCP Spokesperson
MNS News : विदर्भातील मनसेचा बडा नेता अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल

"माझे जीवन, माझे व्हिजन'या आत्मकथेत राजलक्ष्मी भोसले यांनी राजकीय वाटचाल प्राधान्याने मांडली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यां, त्या काळात केलेले काम, पुढे नगरसेवक, महापौर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यां म्हणून कशा प्रकारे जबादारी पार पाडली याचाही त्यात उल्लेख केला आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com