NCP Alliance : अजितदादांच्या घरी खलबतं : पुण्यात दोन्ही 'राष्ट्रवादीच्या' आघाडीवर अंतिम मोहोर; जागावाटप ठरले, चिन्हाचाही वाद मिटला

NCP candidate announcement today : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित. अजित पवार यांच्या घरी महत्त्वाची बैठक; आज उमेदवारांची घोषणा शक्य.
NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar Pune Municipal Corporation elections
NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar Pune Municipal Corporation elections Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी बाबत नाट्यमय घटना घडताना पाहायला मिळत आहेत. एका क्षणाला दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार असं चित्र स्पष्ट होत असतानाच दुसऱ्या क्षणाला आघाडी तुटल्याच्या बातम्या येताना पाहायला मिळत आहेत. मात्र, आता या सर्व नाट्यमय घटना संपल्या असून राष्ट्रवादीचा फॉर्मुला निश्चित झाला असल्याचं सांगितलं जात आहे.

दोन राष्ट्रवादीतील तिढा मिटला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चिन्ह बाबतची अट मान्य केली असल्यास सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार हे आपापल्या म्हणजेच घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar Pune Municipal Corporation elections
Kolhapur Mahayuti Formula : कोल्हापूरचा तिढा सुटला! महायुतीचा 'फायनल फॉर्म्युला' तयार; थोड्याच वेळात मोठी घोषणा?

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये आघाडीत शरद पवारांच्या पक्षाकडून 65 जागांची मागणी करण्यात अली होती. मात्र अजित पवारचा पक्ष 35 जागा देण्यास तयार होते. त्यानंतर वाटाघाटी होऊन आता अजित पवार यांचा पक्ष 125 तर शरद पवार यांचा पक्ष 40 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आघाडीचा हाच फॉर्मुला असणार असल्याचे देखील बोलले जात आहे.तसेच आज दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

NCP leaders Ajit Pawar and Sharad Pawar Pune Municipal Corporation elections
Sharad Pawar News : शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड

आघाडीची घोषणा होतच अजित पवारांच्या पक्षाची आज पहिली यादी जाहीर होणार आहे. याबाबत अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. दहा ते पंधरा जागांबाबत उमेदवारीचा तिढा फसला आहे. त्याबाबत चर्चा करून अजित पवार आज संध्याकाळ पर्यंत पहिली यादी जाहीर करणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com