Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी फडणवीसांना पुन्हा फटकारलं ; "फडणवीसांचे महत्व.."

Sharad Pawar Attacks on Devendra Fadnavis : आता यावर मी काही बोलणार नाही.
Sharad Pawar, Devendra Fadanavis
Sharad Pawar, Devendra FadanavisSarkarnama

Sharad Pawar Attacks on Devendra Fadnavis : तीन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या शपथविधीचे कवित्व अजून संपलेलं दिसत नाही, अजूनही या विषयावर उलट-सुलट प्रतिक्रिया येतात..आरोप-प्रत्यारोप,गौप्यस्फोट यांच्या फैरी झडत असतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधींची चर्चा आजही तेवढीच रंगते.

दोन दिवसापूर्वीच फडणवीस यांनी याबाबत गौप्यस्फोट करुन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. "विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पूर्ण कल्पना होती,किंबहुना त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं’, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला आहे.

फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत आज पत्रकारांनी पुन्हा शरद पवारांना प्रश्न विचारला. मात्र, आता यावर मी काही बोलणार नाही. मला देवेंद्र फडणीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांना त्या विधानावरुन फटकारले. पुण्यात आयोजित 'बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद' या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Sharad Pawar, Devendra Fadanavis
Shinde vs Thackeray : सत्तासंघर्षांवर शरद पवार म्हणाले, "काय होणार हे सांगणं.."

यावर पवारांनी यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. "मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा फेटाळून लावला होता.

राज्यातील सत्तासंघर्षांवर पवार म्हणाले, "सत्तासंघर्षांबाबतची पुढील सुनावणीत काय होणार हे सांगणे अवघड आहे.काय होतं हे इंटरेस्टिंग आहे," सध्या पु्ण्यात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.

कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. रवींद्र धंगेकरांनी त्यांची भेट घेतली आहे, याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "धंगेकर हे मला भेटून गेले आहेत. दोन्ही मतदार संघात जाणार आहे,"

पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा येत्या 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे. तर, तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी सकाळी 11 वाजता होणार शरद पवारांची सभा पार पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com