Shinde vs Thackeray : सत्तासंघर्षांवर शरद पवार म्हणाले, "काय होणार हे सांगणं.."

Supreme Court on Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षांबाबतची पुढील सुनावणी ही २१, २२ फेब्रुवारी रोजी होत आहे.
 Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court on Maharashtra Political Crisis :राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीन कोर्टात सुरु आहे. आता येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. 'ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर घ्यावी,' अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी न्यायालयानं फेटाळली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते पु्ण्यात माध्यमांशी बोलत होते.

"सत्तासंघर्षांबाबतची पुढील सुनावणी ही २१, २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या सुनावणीत काय होणार हे सांगणे अवघड आहे. काय होतं हे इंटरेस्टिंग आहे," असे शरद पवार म्हणाले. पुण्यात आयोजित 'बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद' या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या पु्ण्यात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. रवींद्र धंगेकरांनी त्यांची भेट घेतली आहे, याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "धंगेकर हे मला भेटून गेले आहेत. दोन्ही मतदार संघात जाणार आहे,"

 Sharad Pawar
BJP नेत्याचा 'पराक्रम' ; तो VIDEO हायरल, नेटकरी संतप्त, 'महिला पोलिसासोबत ..

कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा येत्या 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे. तर, तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी सकाळी 11 वाजता होणार शरद पवारांची सभा पार पडणार आहे.

आसामच्या मुख्यमंत्री हेमंत सरमा यांनी भीमाशंकर हे ज्योतीर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "सगळ्या देशाला माहिती आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत. मुख्य विषय बदलण्यासाठी हे विषय काढले जातात,"

सहकार महापरिषदेत शरद पवार म्हणाले, "आपल्याकडील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कृषी विभाग हा केवळ ऊस गाळपाच्या नियोजना पुरताच मर्यादित आहे. ऊसाची गुणवत्ता, वेगवेगळे नवे वाण, त्यावरील संशोधन आणि नवे प्रयोग यामध्ये कारखान्याच्या कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कारखान्याचा कृषी विभाग अधिक सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. उसापासून केवळ चांगला उतारा आणि त्यातून साखर एवढ्यावरतीच हा उद्योग आता तरुण जाणार नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com