Sharad Pawar : पांडुरंगाच्या दर्शनावर शरद पवार, म्हणाले,' 'गाजावाज,नाटक करतं... '

Sharad Pawar darshan of shri Pandurang : वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे, पांडुरंगाच्या नावाने व्यावसाय करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही, असे देखील शरद पवार यांनी सांगितले.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : 'अस्तिक की नास्तिक माझ्याबद्दल बोलतं जातं. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो. पण मी कधी गाजावाजा करत नाही. नाटक करत नाही. दर्शन करायला जातो हे काय जगाला सांगायची गरज नाही, प्रसिद्धीपेक्षा दर्शन समाधानकारक असतं, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे, पांडुरंगाच्या नावाने व्यावसाय करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही, असे देखील शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी अध्यात्मिक वारकरी आघाडी आयोजित वारकरी संमेलनात शरद पवार बोलत होते.

'मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही जाणार आहात का? मी म्हणलो हो जाणार आहे. काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली पण हे जे लोकं आहेत पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का?', असा सवाल शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar
Atul benke : 9 मिनिट 51 सेकंदाच्या भाषणात अजितदादांचा आमदार म्हणतो, 'जिथे पवारसाहेब तेथे जास्त बोलायचं नसतं'

'अनेक वेळा मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, वारकरी संप्रदाय, अधात्मिक आघाडी नावाने काम करणारे अनेक घटक आहेत. त्यांचे किर्तन, विचार ऐकण्याचा संबंध येतो. पण अस्वस्थ वाटते. सामाजिक ऐक्याच्या संदर्भात, कर्मकांड आणि जुन्या प्रवृत्ती याच्या विरोधी भूमिका घेण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे घटक जात, धर्म बघून भूमिका घेतात. सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशी भूमिका मांडतात. तेव्हा खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही', असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Cabinet Meeting : शेतकरी, सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूषखबर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे 19 निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com