Lok Sabha Election 2024 : ...अन् पवारांबरोबरच्या बैठकीतून जानकर तडकाफडकी निघून गेले; नेमकं काय घडलं?

Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर, शेकापचे अनिकेत देशमुख लढण्यास इच्छुक आहेत.
mahadev jankar sharad pawar
mahadev jankar sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) घोषणा झाली तरी महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप झालं नाही. माढा लोकसभा मतदारसंघाचा ( Madha Lok Sabha Constituency ) तिढाही सुटेना झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता प्रचाराला सुरुवात केली आहे. धैर्यशील मोहिते-पाटलांनी 'तुतारी' हाती घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. पण, त्यावर मोहिते-पाटलांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. दुसरीकडे शेकापचे अनिकेत देशमुख, रासपचे महादेव जानकरसुद्धा माढा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

यातच महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली आहे. नियोजित वेळेच्यापूर्वी जानकर शरद पवारांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी आले. या वेळी शरद पवार आणि जानकर यांच्यात माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा झाली. तेव्हा आपण माढ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं जानकरांनी पवारांना सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण, शरद पवारांनी ( Sharad Pawar ) जानकरांना उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जानकर ( Mahadev Jankar ) तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे. जानकरांनी मंगळवारी ( 19 मार्च ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण, महायुतीकडूनदेखील कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जानकरांनी पवारांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत चाचपणी केली.

mahadev jankar sharad pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'तुतारी' देशभर वाजणार, पण 'घड्याळा'ची धाकधूक; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

दरम्यान, भाजपनं माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते-पाटील नाराज झाले आहेत. धैर्यशील मोहिते-पाटलांनी माढ्यातून उमेदवारी मागितली होती. पण, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूर उमटला आहे. दोन दिवसांपूर्वी अकलूजमधील 'शिवरत्न' बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांनी चर्चा झाली होती. यानंतर गिरीश महाजन यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी परवडणार नाही, असं विधान केलं होतं.

दुसरीकडे आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आता महाविकास आघाडीतून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. मोहिते पाटील जर 'तुतारी' घेऊन निवडणूक लढविण्यास तयार असतील, तर उमेदवाराच्या शोधात असणारे शरद पवार हे ही संधी सोडणार नाहीत.

R

mahadev jankar sharad pawar
Sharad Pawar News : शिवतीर्थावरून शरद पवारांचा 'मोदी की गॅरंटी'वर जोरदार निशाणा, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com