Sharad Pawar News : 'तुतारी'च्या प्रचारासाठी शरद पवारांच्या कार्यकर्त्याची 'हटके आयडिया'; तयार केली चक्क 'चांदीची टोपी'!

Lok Sabha Election 2024 : खास शरद पवारसाहेबांचा प्रचार करण्यासाठी 45 हजार रुपये खर्चून ही टोपी बनवलेली आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणुका लागल्या की आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी कार्यकर्ते वेगवेगळे फंडे वापरत असतात. आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारातून आपल्या नेत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. यामुळे अशा हटक्या प्रचाराची चर्चा होत असते. असाच एक बारामतीचा कार्यकर्ता आहे, ज्यांनी प्रचारासाठी चांदीची टोपी बनवली आहे. गणेश नवले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यांनी बनवलेल्या टोपीची चांगलीच चर्चा आता होत आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
Solapur NCP : सोलापूर शहर राष्ट्रवादीची 146 पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर

अशी टोपी बनवण्यामागचा उद्देशाबाबत नवले म्हणाले, 'बारामतीत अनेक लोक पवारांना मानणारे आहेत. मला माझी प्रतिक्रिया व्यक्त करायची होती. त्यानुसार मीही टोपी बनवण्याचा निर्णय घेतला. अर्धा किलो चांदी वापरून ही टोपी तयार केली आहे. टोपीच्या एका बाजूला शरद पवार तर (NCP) दुसऱ्या बाजूला ताईसाहेब असं लिहिलेलं आहे. या टोपीवर तुतारी हे पक्षचिन्हंही आहे. खास शरद पवारसाहेबांचा प्रचार करण्यासाठी 45 हजार रुपये खर्चून ही टोपी बनवलेली आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
Rohit Pawar On BJP: 'नया है वह'; मनसेचा महायुतीत सहभाग? रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

'मी प्रचार सुरू करून पंधरा वीस दिवस झाले आता पहिल्यांदाच मी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला आलो आहे. आता साहेबांचा आशीर्वाद घेऊन जाणार आहे. आमचा नेता शेतकऱ्यांचा देव आहे. त्यांच्यासाठी कायपण,' असे नवले यांनी म्हटले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com