Rohit Pawar On BJP: 'नया है वह'; मनसेचा महायुतीत सहभाग? रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra LokSabha Election 2024 : फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही, तर दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरत आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Mumbai Political News : 'अबकी बार ४०० पार', असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) व्यक्त केला आहे. मोदींचा विश्वास सार्थ करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन गट यापाठोपाठ भाजपने मनसेलाही (MNS) सोबत घेण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजप पराभवाच्या भीतीपोटी आता छोटे-छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही, तर दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरत असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे."या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष नया है वह असेच म्हणत असतील,' असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातल्या मनात मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर छोटे पक्ष, आघाड्यांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपप्रणित महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बैठकीत जागावाटपावरून चर्चा झाल्याचे समजते.

R

Rohit Pawar
Shantigiri Maharaj News: प्रचारात संत जनार्दन स्वामींचा फोटो? शांतीगिरी महाराजांना विरोध

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com