Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार ? ; सुळे म्हणाल्या..

NCP News : कार्यकारी अध्यक्षपद मिळेल, याची कल्पना नव्हती..
Supriya Sule-Sharad Pawar
Supriya Sule-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्या कुणाला रिपोर्ट करणार याविषयी सांगितले. त्या पुण्यात बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी शरद पवारसाहेबांना आणि प्रफुल्ल पटेल यांना रिपोर्टिंग करणार आहे. तर राज्यात छगन भूजबळ, अजित पवार, जयंत पाटील यांना रिर्पोट करणार आहे,"

Supriya Sule-Sharad Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली ; सुप्रिया सुळे, पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी..

"पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद मिळेल, याची कल्पना नव्हती," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "अजितदादा हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांचा रोल खूप मोठा आहे. विरोधीपक्ष नेता हे पद मुख्यमंत्री पदाएवढेच मोठे पद आहे," एका प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "आमचा पक्ष चर्चेतून चालतो, लोकशाही मार्गाने चालतो, लाँबिगने नव्हे,"

Supriya Sule-Sharad Pawar
NCP Anniversary News : 'पंचवीशी' राष्ट्रवादीची, आतुरता मुख्यमंत्री पदाची..! संधीचं सोनं करण्याचं..

सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडीवर घराणेशाहीचा आरोप विरोधकांनी केला आहे. "ज्या पवार कुटुंबियात माझा जन्म झाला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून नव्हे तर माझे काम बघून मला संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे, पण विरोधकांना सोयीनुसार घराणेशाही दिसते," अशा शब्दात सुळे यांनी विरोधकांना सुनावलं.

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल आधीपासूनच राष्ट्रीय कार्यकारीणत सक्रिय आहेत. मी सुरुवातीपासून काम करत आलो आहोत, त्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम तेच जुने असल्याचे पटेल म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com