Manchar Bazar Samiti : देवदत्त निकमांच्या बंडखोरीमुळे गाजलेल्या मंचर बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे भालेराव

Manchar Bazar Samiti Sabhapati Election : सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या वेळी देवदत्त निकम मात्र गैरहजर राहिले होते.
Manchar Bazar Samiti Sabhapati
Manchar Bazar Samiti SabhapatiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : देवदत्त निकम यांच्या बंडखोरीमुळे गाजलेल्या मंचर बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव भालेराव यांची, उपसभापती सचिन पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ आणि तरुणांचा समतोल साधून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने या दोघांना संधी देण्यात आली. ही निवड अडीच वर्षांसाठी असणार आहे. (NCP's Bhalerao as Chairman of Manchar Bazar Samiti)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तत्कालीन सभापती देवदत्त निकम यांना उमेदवारी नाकारली होती. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे निकम यांनी ती निवडणूक जिंकलीसुद्धा होती. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रथमच आंबेगावात धक्का बसला होता.

Manchar Bazar Samiti Sabhapati
Bharat Gogawale News : मंत्रिपदासाठी भरत गोगावले अधीर; ‘कपडे तयार ठेवलेत, आता फक्त शपथविधी सोहळ्याची वाट बघतोय’

आंबेगाव तालुक्यातील मंचर (Manchar) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत १८ जागांपैकी १७ जागा जिंकून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते. एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर, माजी सभापती देवदत्त निकम निवडून आले होते. सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या वेळी देवदत्त निकम मात्र गैरहजर राहिले होते.

Manchar Bazar Samiti Sabhapati
Maharashtra Politics: फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

सभापतीपदासाठी भालेराव व उपसभापतीपदासाठी पानसरे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक पी. एस. रोकडे यांनी त्यांची बिनविरोध निवडणूक जाहीर केली. सभापती व उपसभापतीपदाची निवड ही अडीच वर्षासाठी करण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांनी जाहीर केले.

Manchar Bazar Samiti Sabhapati
Mangalveda Bazar Samiti: मंगळवेढ्यात काकानंतर पुतण्याला संधी; बाजार समिती सभापतीपदी सुशील आवताडे बिनविरोध

निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती वसंतराव भालेराव आणि उपसभापती सचिन पानसरे म्हणाले की, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज केले जाईल. संचालक मंडळ, व्यापारी, हमाल व शेतकऱ्यांशी योग्य समन्वय साधून सर्व घटकांना न्याय दिला जाईल. भाजीपाला बाजार सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com