Maharashtra Politics: फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

Pravin Darekar New Responsibility By BJP: महिनाभर चालणाऱ्या या अभियानावर दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचेही लक्ष असणार आहे.
Pravin Darekar
Pravin Darekar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कर्नाटकातील पराभवानंतर भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) खडबडून जागे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने महासंपर्क अभियानाचे आयोजन केले असून त्याद्वारे केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. या अभियानाची जबाबदारी भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवली आहे. (Pravin Darekar has been assigned an important responsibility by BJP!)

कर्नाटक विधानसभेतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आगामी चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघात भाजपकडून ३१ मे ३१ जून या कालावधीत महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.

Pravin Darekar
Mangalveda Bazar Samiti: मंगळवेढ्यात काकानंतर पुतण्याला संधी; बाजार समिती सभापतीपदी सुशील आवताडे बिनविरोध

या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती समाजातील विविध घटकांना देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानावर दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचेही लक्ष असणार आहे. (Political Short Videos)

महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम पोचविण्याचे काम होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी या अभियानाची जबाबदारी स्वीकारली आहे. या अभियानात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा, लाभार्थी, बुद्धीवंतांचं संमेलन किंबहुना थेट मतदारांशी संपर्क साधण्याचे काम केले जाणार आहे, असे या अभियानाचे प्रमुख प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

Pravin Darekar
Akluj Bazar Samiti : अकलूजमध्ये पुन्हा मोहिते पाटील; मदनसिंहांकडे सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा; पांढरेंना एकनिष्ठेचे फळ

दरम्यान, भाजपच्या निवडणूक तयारीनंतर शिंदे गटही जागा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्या (ता.२३) वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, लोकसभेची २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व्यूहरचना आखली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील शिंदे गटाकडून घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Political Breaking News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com