Bazar Samiti Result: राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेसला पुरुन उरले

Khed Bazar samiti Result | खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सत्ता कायम राखली
Khed Bazar samiti
Khed Bazar samitiSarkarnama

Bazar samiti Result : पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी सत्ता कायम राखली. त्यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले. ते एकटे भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि ठाकरे गट अशा चार पक्षांना पुरुन उरले. (NCP's Dilip Mohite defeated Shiv Sena, Thackeray Group, BJP, Congress)

आ. मोहितेंच्या श्री.भीमांशकर शेतकरी सहकारी पॅनेलचा बाजार समितीतील विजय हा एक प्रकारे राज्यातील भाजप आणि शिंदे शिवसेनेवरील विजय आहे.कारण या दोन्ही पक्षांनी आ. मोहितेंविरोधात युती केली होती. तसेच त्यांनी आपला कट्टर राजकीय वैरी ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसलाही बरोबर घेत श्री.भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन स्थापन केले होते.

Khed Bazar samiti
Bazar Samiti Election: पारोळ्यात चिमणराव पाटलांच्या हातातून सत्ता जाणार ? ; सतीश पाटलांची कसोटी..

आ. मोहिते हे अण्णा म्हणून परिचित आहेत. तसेच मावळचे राष्ट्रवादीचेच आमदार सुनील शेळकेही अण्णा म्हणूनच ओळखले जातात. खेडच्या आमदार अण्णांनी बाजार समितीला बाजी मारली.आता, मावळचे आमदार अण्णा ती मारणार का, अशी चर्चा खेडच्या निकालानंतर मावळमध्ये सुरु झाली आहे. कारण तेथील बाजार समिती निवडणुकीचा निकाल हा आज (ता.२९) लागणार आहे.

आ. मोहितेंविरुद्ध त्यांच्या विरोधकांनी एक होऊन निवडणूक लढविण्याचा आणखी एक प्रयत्न बाजार समितीत फेल ठरला. यापूर्वीही विधानसभा,जिल्हा परिषद,तालुका पंचायत आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक ते मोहितेंविरुद्ध एक होत लढत आहेत. २०१४ च्या विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना त्यात २००४ पासून आतापर्यंत य़श आलेले नाही. यावेळी,तर राज्यातील सत्ताधारी शिवसेना,भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत बाजार समितीत परिवर्तन होईल,असा दावा केला होता. तो फोल ठरला.

Khed Bazar samiti
Bazar Samiti Results : गंगाखेड बाजार समितीत रत्नाकर गुट्टेंना धक्का; 18 पैकी 11 जागांवर महाआघाडीचे उमेदवार वियजी

फक्त त्यांची स्थिती थोडी सुधारली. म्हणजे गतवेळपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या. चारच्या त्या सहा झाल्या. मात्र, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर तसेच अमोल पवार आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे बंधू विश्वास यांचा पराभव धक्कादायक आहे. त्यातही विश्वास बुट्टे यांचा पराभव हा शरद बुट्टे यांचाच पराभव समजला जात आहे. कारण शरद बुट्टे आणि पोखरकर हे त्यांच्या पॅनेलचे प्रमुख होते.त्यांची नावे २०२४ च्या विधानसभेसाठी घेतली जात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com