भाजपने बारामतीतील राष्ट्रवादीचा महत्वाचा मोहरा लावला गळाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
Dr. Archana Patil joins BJP
Dr. Archana Patil joins BJPSarkarnama
Published on
Updated on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील (Archana Patil) यांनी गुरुवारी (ता. २९ सप्टेंबर) भारतीय जनता पक्षात (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात प्रवेश केला. डॉ. अर्चना पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातील महिला आघाडीचा एक महत्वाचा मोहोरा फोडण्यात यश मिळविले आहे. (NCP's Dr. Archana Patil joins BJP)

डॉ. अर्चना पाटील ह्या मूळच्या इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आहेत. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला पराभव झाला होता.

Dr. Archana Patil joins BJP
महेश कोठे राष्ट्रवादीत कधी येणार? : सोलापुरातील नेत्यांचा प्रश्न; जयंत पाटील म्हणाले, ‘ते आपलेच’!

डॉ. अर्चना पाटील यांनी यापूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती. पण, पाटील या सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाला अनेकदा प्रश्न विचारत असत.

Dr. Archana Patil joins BJP
...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती : चव्हाणांनंतर राऊतांचा गौप्यस्फोट

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने ओबीसींना न्याय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले होते. भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले. भाजपकडूनच आम्हाला अपेक्षा असल्याने आम्ही पक्षात प्रवेश केला आहे, असे डॉ. अर्चना पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com