‘मातोश्री’वर हल्ला करायचा होता; म्हणजे काय किंमत मोजावी लागली असती, ते कळले असते!

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा आणि हल्लाच करायचा होता, तर ‘मातोश्री’वर करायचा.
Silver Oak Attack
Silver Oak Attack Sarkarnama

राजगुरुनगर (जि. पुणे) : ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा आणि हल्लाच करायचा होता, तर ‘मातोश्री’वर (Matoshri) करायचा. मग तुम्हाला कळलं असतं, हल्ल्याची किंमत काय मोजायला लागली असती,’ अशा शब्दांत हल्लेखोर आणि त्यामागे असणाऱ्या शक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी समाचार घेतला (If Matoshri had been attacked, you would have known the price : Dilip Mohite)

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथून पुणे-नाशिक महामार्गावरुन राजगुरुनगर पोलिस ठाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या मोर्चासमोर आमदार मोहिते बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे परिवहन खातं शिवसेनेच्या अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे, मग तुम्हाला जे काय करायचे, ते ज्याच्याकडे खातं आहे, तिकडे करायचे. ज्या विषयाशी शरद पवारांचा (sharad pawar) संबंध नाही, जो विषय पवार हाताळत नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे. महाविकास आघाडी सरकार चालविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी हल्ला घडवून आणल्याचा आरोप दिलीप मोहिते यांनी केला आहे.

Silver Oak Attack
Silver Oak Attack : मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आक्रमक : वळसे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

राज्याच्या सर्वोच्च पदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्यातील मंत्रिमंडळात कुठलाही निर्णय झाला, तर मुख्यमंत्री त्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. एसटी कामगारांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काहीही निर्णय घेतला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाच आक्षेप नव्हता, तरी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याचे काम काही शक्ती करत आहे. त्या शक्तींचा निषेध करण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगून दिलीप मोहिते यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

Silver Oak Attack
'माझी हत्या होऊ शकते' : पोलिसांनी ताब्यात घेताच सदावर्तेंचा वळसे-पाटलांवर गंभीर आरोप

एसटीच्या आंदोलक कामगारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. अशा वाईट प्रसंगातसुद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एसटी कामगारांसमोर हात जोडून मोठं मन दाखवलं, त्याबद्दलही त्यांचे कौतुक या वेळी करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com