Pune Gram Panchayat : पुण्यातील 131 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा ; जिल्हाध्यक्ष गारटकरांचा दावा!

Pune Gram Panchayat : "केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना मिळवलेले हे यश उल्लेखनीय."
Pune Gram Panchayat
Pune Gram Panchayat Sarkarnama

Pune Gram Panchayat : राज्यातील सात हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज लागला. पुणे जिल्ह्यातील 221 पैकी एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसची131 ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला. केंद्रात आणि राज्यात सत्ता नसतानाही, मिळवलेले हे यश उल्लेखनीय असल्याचे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गारटकर म्हणाले, "पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात 221 ग्रामपंचायत पैकी, सरपंच पदाच्या 5 रिक्त जागा वगळता 131 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केल्याचे, या विजयावरून स्पष्ट दिसत आहे."

Pune Gram Panchayat
Winter Session : ग्रामपंचायतीचं अपयश झाकण्यासाठी माझ्या राजीनाम्याची मागणी, आरोपांवर शिंदेंचा पलटवार!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार पदाधिकारी हे गाव पातळीवर तळागाळापर्यंत काम करत असतात. त्यांच्या जनसंपर्कामुळे जनतेशी जोडलेली नाळ आणि केलेल्या विकास कामांमुळेच हे चांगल्या पद्धतीचे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केल्याचे, गारटकर यांनी स्पष्ट केले.

Pune Gram Panchayat
Grampanchayat Result : लातूरात भाजप दीडशेपार ; तर काॅंग्रेस शतकाच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यातील 131 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता प्रस्थापित केल्याचा दावा गारटकर यांनी केला आहे, त्यामध्ये बारामती तालुक्यातील 13, मुळशी 11, खेड 18, आंबेगाव 17, शिरूर 2, वेल्हा 13, भोर 24, जुन्नर 10, मावळ 7, इंदापूर 12, हवेली 3, दौंड 1 या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com