Winter Session : ग्रामपंचायतीचं अपयश झाकण्यासाठी माझ्या राजीनाम्याची मागणी, आरोपांवर शिंदेंचा पलटवार!

Winter Session : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी या मुद्यावर विधीमंडळात जोरदार घोषणाबाजी केली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Winter Session : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Nagpur Land) यांच्यावर भूखंडवाटपावरून विरोधकांनी आरोप केले होते. शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री असताना नागपुरातील शंभर कोटींपेक्षा अधिक किंमतीचे भूखंड फक्त दोन कोटी रूपयांमध्ये बिल्डरांना दिल्याप्रकरणी विरोधकांनी अधिवेशनात त्यांना धारेवर धरले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी या मुद्यावर विधीमंडळात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदेचा राजीनाम्याची मागणाही करण्यात आली होती. यावर आता खुद्द शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व आरोप फेटाळत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Eknath Shinde
Grampanchayt Result : दानवेंनी ग्रामपंचायत राखली, भावजय विजयी, तिकडे मेव्हणाही जिंकला..

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "जे सत्य आहे ते आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल. सभागृहामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या मध्ये २००७ च्या सरकारने घेतलेला जो निर्णय आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी र्आम्ही केली. ज्या वेळेस आम्हाला हे कळलं हा न्यायालयाचं प्रकरण आहे. गिलानी समितीचा विषय आहे. त्यावेळी तात्काळ आम्ही स्वत:हून तो ही निर्णय घेण्याचा धाडसी पाऊल आम्ही उचललं. विरोधकांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार काय आहे? त्यांचे नेते जेलमध्ये त्यांच्या राजीनामा नाही घेतला त्यांचं जे अपयश आहे, आजच्या ग्रामपंचायत आम्ही जो विजय मिळवला आहे.ते अपयश झाकण्यासाठी त्यांना माझ्यावर आरोप केला आहे."

Eknath Shinde
Grampanchayat Election : हंसराज अहिरांच्या प्रयत्नांनंतरही सावळीमध्ये भाजपचा दारूण पराभव

यावर खुलासा करताना फडणवीस म्हणाले, 'एका वाक्यात सांगायचं झालं, हा आरोप म्हणजे खोदा पहाड और चुहा भी नही निकला. भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे जे प्रकार आहेत. त्याचा त्यांना इतका सराव आहेत.त्यांना माहितच नाही की, नागपूरमध्ये गुंठेवारीत गरिबांची घरं २००१ नंतर नियमित करण्याचा निर्णय झाला. ती ही घरं आहेत. त्यातले हा आराखडा आहे. या आराखड्याचा उल्लेख शिंदेंनी घेतलेला निर्णय नाही. २००७ साली माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जे ४९ आराखडे मंजूर केले, ते हे आराखडे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रयत्न होता हिट अँड रनचा. आरोप लावून पळून जायचं, पण आम्ही त्यांना पळू दिले नाही, पळता भुई थोडी केली. त्यांच्या आरोपांना चोख उत्तर आम्ही दिलंय. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com