Pune PMC: पुणे महापालिकेत 'श्रीराम मंदिरावरातील चोरीवरून' हाय-व्होल्टेज ड्राम : काँग्रेसच्या टायमिंगने भाजप नगरसेवकांची कोंडी

Pune News, PMC General Body, Ram Mandir Theft: पुणे महापालिकेच्या सभेत अयोध्या राम मंदिरातील कथित चोरीवर काँग्रेसने तहकूब सूचना मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुमताच्या जोरावर सूचना फेटाळण्यात आली.
PMC
PMC Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (३० जून) अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधाची तहकूब सूचना फेटाळण्यात आली पण या संपूर्ण प्रकरणावरून सभागृहात चांगलंच 'हाय व्होल्टेज' राजकीय नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी भाजपसह अनेक पक्षांच्या सदस्यांनी दांडीमारल्यामुळे गणसंख्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. नेमका याच संधीचा फायदा उचलत काँग्रेसने तहकूब सूचना मांडली आणि सत्ताधाऱ्यांना पुरतं कोंडीत पकडलं. यामुळे महापालिकेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं.

मंगळवारी (३० जून) सकाळी ठीक ११.१५ वाजता सर्वसाधारण सभेला सुरवात झाली. मात्र, सभागृहात नजर टाकताच सदस्यांची उपस्थिती अगदीच अल्प असल्याचं चित्र समोर आलं. विशेष म्हणजे, महापालिकेत तब्बल १२१ नगरसेवकांचं संख्याबळ असलेल्या भाजपचे केवळ २१ सदस्यच सुरुवातीला बाकांवर हजर होते. त्यामुळे सभागृहाचा कोरम पूर्ण होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला. 'आता काय करायचं?' यावर पदाधिकारी, सभागृह नेत्यामध्ये खलबतं सुरू झाली. जर आवश्यक सदस्यसंख्या पूर्ण झाली नसती, तर सभाच तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली असती.

PMC
Maharashtra News Live Update : विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सत्ताधाऱ्यांची हीच नस पकडत काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी थेट अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीचा निषेध करणारी तहकूब सूचना सभागृहात आणली आणि या विषयावर तातडीने चर्चा करण्याची आक्रमक मागणी केली. पाठोपाठ काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनीही या तहकूब सूचनेवर सविस्तर भाषणाची परवानगी मागत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची खेळी खेळली. राम मंदिराच्या मुद्द्यावर जर चर्चा रंगली असती, तर सत्ताधारी भाजपला राजकीयदृष्ट्या बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला असता, अशी जोरदार चर्चा तिथे रंगली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आणि गांभीर्य ओळखून महापौरांनी मोठा पेच टाळण्यासाठी दीर्घ चर्चा न करता थेट मतदानाचा मार्ग निवडला. मतदानाच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी कशीबशी जुळवाजुळव केली, ज्यामुळे तहकूब सूचनेच्या विरोधात ३१ तर बाजूने अवघी ४ मते पडली. बहुमताच्या जोरावर ही तहकूब सूचना फेटाळण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं.

PMC
Maharashtra News Live Update : केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, ओम राजेनिंबाळकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

हा राजकीय ड्रामा संपल्यानंतर काही वेळातच सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. यात गंमत अशी की, मतदानाची प्रक्रिया पार पडताच उशिरा जागे झालेले अनेक भाजप नगरसेवक सभागृहात अवतरले. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या लेट लतीफ नगरसेवकांची पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चांगलीच 'कानउघाडणी' केल्याची गरमागरम चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com