Nikhil Wagle
Nikhil WagleSarkarnama

Nikhil Wagle : हल्ल्याच्या घटनेला वागळेच कारणीभूत; पुणे पोलिसांचा दावा

Nikhil Wagle's Car Attacked In Pune Police Issued Press Release : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकाद्वारे दिली मोठी माहिती...
Published on

Pune Latest News :

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात शुक्रवारी भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तर दांडेकर पूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी येताना वागळे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार वागळे यांनीच ओढावून घेतला असल्याचा दावा आता पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे यासाठीची प्रेस नोटही Pune Police यांनी काढली आहे.

Nikhil Wagle
Nikhil Wagle Attack : वागळेंची गाडी फोडणं भोवलं; घाटे, मानकरांसह 43 जणांवर गुन्हा दाखल

वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने शहरातील वातावरण तापले होते. वागळे पुण्यात आल्यानंतर पोलिस अधिकारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. शहरात तयार झालेल्या वातावरणाची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने विरोध करणारे कार्यकर्ते असल्याने आम्ही जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही कार्यक्रमस्थळी जाऊ नका, असा सल्ला पोलिसांनी दिला. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती.

हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी सभागृहात होणार होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे 25 आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. आणखी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, तत्पूर्वीच वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी निघाले. आंदोलनाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे जोपर्यंत आंदोलकांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत तुम्ही इकडे येऊ नका, असे वागळे यांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. पोलिसांचे लक्ष विचलित करून ते दुसऱ्या मार्गाने गेले. तरीही साध्या वेशातील पोलिस कर्मचारी त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या गाडीच्या मागे होते. वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी आंदोलक आणि त्यांची गाडी यामध्ये साध्या वेशातील पोलिस सुरक्षिततेसाठी होते. मात्र, रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी आणि आंदोलक हे जवळच असल्याने त्यांना आणि त्यांच्या गाडीला तातडीने बाहेर काढणे शक्य नव्हते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर दंगल पसरविणे, मालमत्तेचे नुकसान करणे, तोडफोड करणे, या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. यामध्ये दोषी असलेल्या आरोपींची कोणतीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी या प्रकरणाबद्दल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

edited by sachin fulpagare

R

Nikhil Wagle
Nikhil Wagle : निखील वागळेंवर पुण्यात हल्ला; 'हे' आहे कारण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com