Nikhil Wagle Attack : वागळेंची गाडी फोडणं भोवलं; घाटे, मानकरांसह 43 जणांवर गुन्हा दाखल

Political News - 'निर्भय बनो' कार्यक्रमात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने वागळे, आयोजक तसेच नागरिकांवरदेखील गुन्हे
nikhil wagle
nikhil wagle Sarakrnama
Published on
Updated on

Pune News : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आता पुणे पोलिसांनी ' निर्भय बनो ' कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दखल केले आहेत. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 250 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, अजून काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

पत्रकार निखिल वागळे हे शुक्रवारी 'निर्भय बनो' या कार्यक्रमासाठी येत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध चौकांत त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना इजा पोचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी हल्लेखोरांनी दगड, अंडी, काठ्या याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. वागळे यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी 43 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवरदेखील पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

nikhil wagle
Sunil Tatkare : गितेंना पाडणारा भाजपचा नेता म्हणतोय, यंदाच्या निवडणुकीत रायगडमधून तटकरेंचा कडेलोट करायचाय !

या कार्यक्रमाच्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आले होते. त्यांनी एकमेकांच्या धिक्काराच्या घोषणा देत आंदोलन केले. यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

दांडेकर पूल येथील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक आले होते. 'निर्भय बनो' सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. आयोजकांनी जमावबंदी आदेश मोडल्याचे आणि येथे बेकायदा गर्दी जमवल्याचे कलम लावत पोलिसांनी 250 जणांवर गुन्हे नोंदविले. यामध्ये एक गुन्हा वागळे यांची गाडी फोडणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या व्यक्तीने विरोधात दुसरा गुन्हा आयोजक आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

एवढा प्रचंड जनसमुदाय 'निर्भय बनो' सभेला उपस्थित होता, पोलिसांनी मात्र जमावबंदी आदेश मोडल्याचे २५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा कार्यक्रम येथे होणार होता तेथे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हे सर्व तेथे जमा झाल्याने या आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून विरोध होत असतानाही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमस्थळी पोचेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर चार ते पाच वेळा हल्ला केला. या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई फेकण्यात आली. त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. पोलिस बंदोबंस्तात प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली.

म्हणून केला वागळेंवर हल्ला

पत्रकार वागळे यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कार्यक्रम उधळून देण्याचा इशारा दिला होता. हा विरोध डावलूनदेखील वागळे कार्यक्रमस्थळी यायला निघाल्याने कायदा हातात घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला.

(Edited by Sachin Waghmare)

R

nikhil wagle
Nikhil Wagle Attack : भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली; अजित पवारांचा कडक शब्दांत इशारा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com