Pune Police : पुणे पोलिसांना चकवा देत परदेशात पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी घायवळच्या घरावर पुन्हा छापेमारी केली आहे. पोलिसांना छापेमारीत त्याच्या कोथरुडमधील घरातून बंदुकीच्या गोळ्या, सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची संदर्भात कागदपत्र सापडली आहेत.
याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाइल्स देखील पोलिसांनी केल्या जप्त केल्या आहेत. पवनचक्की प्रकल्पामध्ये निलेश नेमका कसा सहभाग आहे तसेच या फायईल्समध्ये नेमके काय आहे, हे समजू शकले नाही. मात्र, या फाईल्समुळे त्याचे मराठवाडा कनेक्शन उघड झाले आहे.
पुणे पोलिसांनी निलेश अनिधृत मालमत्तेसंदर्भात पुणे महापालिकेला पत्र देखील लिहिले आहे. निलेश घायवळच्या नावावर अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्ताची चौकशी देखील होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सिझ करणार आहे.
पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्याची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. तसेच त्याला पासपोर्ट मिळवून देणाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे. तसेच लूक आऊट नोटीस देखील त्याच्या विरोधात बजावण्यात आली आहे. आणि पुन्हा त्याच्या घरावर छापेमारी करत जमिनीसंदर्भात कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.