Nitin Gadkari : नितीन गडकरी अंबाबाई चरणी; नेमकं काय घातलं साकडं?

Lok Sabha Election : कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला संपयला अवघे तीन दिवस बाकी आहेत. यातच देशाचे रस्ते आणि अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Loksabha Election : कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला संपयला अवघे तीन दिवस बाकी आहेत. यातच देशाचे रस्ते आणि अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे (Hatkangale Loksabha Election) उमेदवार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारार्थ ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

शुक्रवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा संपन्न झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) त्यांच्यासोबत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेण्याचा योग आला. आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न व्हावा, अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली. गरीब मजदूर शेतकरी सुखी व्हावे, जगात आपला देश विश्वगुरु आहे, तसा आर्थिक दृष्ट्‍या ही तिसरी महासत्ता व्हावा. बेरोजगारीपासून देशाला मुक्ती मिळावी ही देवीच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. Lok sabha Election Campaign

Nitin Gadkari
Voters Boycott On Election : साजुरचे मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार; काय आहे कारण?

दरम्यान, मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या प्रचारार्थ हुपरी येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेसनेजी धोरणे राबवली. ती अत्यंत चुकीची होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही जनतेला त्याचा त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काँग्रेसची 60 वर्षातील ध्येयधोरणे आणि आम्ही गेल्या 10 वर्षात राबविलेल्या ध्येयधोरणांची तुलना देशवासीयांनी करावी. देशाचे भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आणि मजबूत राहील याचा विचार करण्याची गरज आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

कोल्हापुरातील प्रचाराची सांगता रविवारी होणार आहे. त्यामुळे तीन दिवसांत प्रचाराचा धडाका लावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी संजय मंडलिक यांच्यासाठी महासैनिक दरबार येथे व्यापारी, उद्योजक यांच्यासमवेत सभा घेणार आहे.

Nitin Gadkari
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात धुरळा उडणार, शरद पवार शशिकांत शिंदेंसाठी, तर फडणवीस उदयनराजेंसाठी मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com